esakal | मुंबईत आजही जोरदार पावसाची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

rain

मुंबईत आजही जोरदार पावसाची शक्यता

sakal_logo
By
समीर सुर्वे -सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुंबईला काल तौक्ते चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) तडाखा बसला. सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे (heavy rain) अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले होते. अनेक गाड्यांवर झाडे पडली. चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेने गेले आहे. (Today Heavy rain possibilty in mumbai)

दरम्यान सोमवारी सुर्यास्तानंतर मुंबईतील वाऱ्यांचा वेग कमी होऊन पावसाचा जोरही ओसरला होता. तर, मंगळवारी काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असून वाऱ्यांचा वेगही ताशी 100 किलोमीटर पर्यंत राहाण्याची शक्यता मुंबई वेधशाळेने वर्तवली आहे. कुलाबा येथे काल कमाल 27.4 आणि किमान 25 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर,सांताक्रुझ येथे कमाल 26.9 किमान 24.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.

चक्रीवादळाचा प्रवास गुजरातकडे होत असला तरी कोकणातील मुसळधार पाउस व जोरदार वारे पाहता सावधगिरी बाळगण्याच्या आणि यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी झाले आहेत. एकूण १२ हजार ५०० जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

हेही वाचा: मुंबईत म्युकर मायकोसिसमुळे पहिला मृत्यू