
मुंबई : आज सकाळच्या सुमारास मुंबईला हादरवणारी घटना घडली आहे. मुंब्रा ते दिवादरम्यान लोकलमधून आठ ते नऊ प्रवासी खाली पडून ६ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. मात्र हा अपघात नेमका कसा घडला, हे प्रवासी नेमके कसे पडले याविषयी धक्कादायक माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.