पाताळगंगात तिसऱ्या डोळ्यांची नजर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाताळगंगात तिसऱ्या डोळ्यांची नजर
पाताळगंगात तिसऱ्या डोळ्यांची नजर

पाताळगंगात तिसऱ्या डोळ्यांची नजर

sakal_logo
By
पाताळगंगात तिसऱ्या डोळ्यांची नजर रसायनी, ता. ११ (बातमीदार) : रसायनी पोलिस ठाण्याची वार्षिक तपासणी रायगड जिल्हा अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी शनिवारी (ता. ८) केली. या वेळी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील एमआयडीसीच्या मुख्य रस्त्यावरील श्री सिद्धेश्वरी कॉर्नर येथे सीसी टीव्ही कॅमेऱ्याचे उद्‍घाटन झेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. श्री सिद्धेश्वरी कॉर्नर येथे तीन रस्ते एकत्र मिळतात. या ठिकाणी वाहतूकीची वर्दळ नेहमी असते. सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याने पोलिसांना गुन्ह्याचा तपास करताना चांगला उपयोग होणार आहे. याप्रसंगी उप विभागीय पोलिस अधिकारी संजय शुक्ला, रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कैलास डोंगरे, सहायक निरीक्षक गोरक्षनाथ बालवडकर, सहायक निरीक्षक एन. डी. गुंड, सहायक निरीक्षक मुल्ला साहेब, उपनिरीक्षक धनाजी काळे, उपनिरीक्षक विनोद वायंगणकर, वासांबे मोहोपाडा माजी सरपंच कृष्णा पारंगे, वडगाव माजी उपसरपंच सुरेश पाटील, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष दीपक कांबळी यांच्यासह रसायनी पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top