मुंबईत उन्हाचे चटके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत उन्हाचे चटके
मुंबईत उन्हाचे चटके

मुंबईत उन्हाचे चटके

sakal_logo
By

मुंबई, ता. १३ : मुंबईतील कमाल तापमानात वाढ झाल्याने दिवसा उन्हाचे चटके बसू लागले आहेत. सांताक्रूझमध्ये शनिवारी ३३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुंबईसह कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ३० अंशाच्या वर नोंदवण्यात आल्याचे भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी सांगितले.

मुंबईत किमान १८.५ व कमाल ३३.५ तापमान नोंदवले गेले. तापमानात तब्बल १५ अंशांचा फरक दिसला. त्यामुळे रात्री गारवा आणि दिवसा उष्णता जाणवली. मुंबईत शुक्रवारपासून कमाल तापमानात वाढ झाल्याचे दिसते. मुंबईसह संपूर्ण कोकणात दिवसाचे कमाल तापमान चढेच राहिले. कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ३० अंशांच्या वर नोंदवले गेले. रत्नागिरी ३५.४, सांताक्रूझ ३३.५, कुलाबा ३२, डहाणू ३१.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top