आरटीई प्रवेशासाठी ऑनलाइन अर्जास मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरटीई प्रवेशासाठी ऑनलाइन अर्जास मुदतवाढ
आरटीई प्रवेशासाठी ऑनलाइन अर्जास मुदतवाढ

आरटीई प्रवेशासाठी ऑनलाइन अर्जास मुदतवाढ

sakal_logo
By

मुंबई, ता. २८ : शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळांत आर्थिक दुर्बल, मागास आदी प्रवर्गांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के प्रवेशाच्या जागांवर ऑनलार्इन प्रवेशासाठी अर्ज करण्यास १० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी आरटीई प्रवेशास सुरुवात झाली असली, तरी मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांतील पालकांना शाळांची नावे आणि त्यांची माहिती नीट नसल्याने यासाठी देण्यात आलेल्या २८ फेब्रुवारीपर्यंतच्या मुदतीत अर्ज भरता आला नाही. त्यामुळे ही मुदतवाढ दिल्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी सांगितले.
प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई प्रवेशासाठी राज्यात नऊ हजार ८४ शाळांची नोंदणी केली आहे. या शाळांमधे एक लाख एक हजार ९४२ जागा उपलब्ध आहेत. यासाठी आतापर्यंत एक लाख ७६ हजार ५२८ पालकांनी पाल्याच्या प्रवेशासाठी ऑनलार्इन नोंदणी केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या थोडी वाढली आहे. मुंबई आणि परिसरातील ३४३ शाळांची नोंदणी या वेळी करण्यात आली असून त्यात सहा हजार ४८० जागा उपलब्ध आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top