रमेश कदम पोलिसांना अपशब्द वापरल्याच्या आरोपातून दोषमुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रमेश कदम पोलिसांना अपशब्द वापरल्याच्या आरोपातून दोषमुक्त
रमेश कदम पोलिसांना अपशब्द वापरल्याच्या आरोपातून दोषमुक्त

रमेश कदम पोलिसांना अपशब्द वापरल्याच्या आरोपातून दोषमुक्त

sakal_logo
By

मुंबई, ता. ७ : अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांना पोलिसांना अपशब्द बोलल्याच्या आरोपातून सत्र न्यायालयाने दोषमुक्त केले. आर्थर रोड कारागृहात कर्तव्यावर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ करत असल्याची त्यांची एक व्हिडिओ क्लिप वायरल झाली होती. दुसऱ्या कारागृह सेलमध्ये जाण्यावरून त्यांची पोलिसांबरोबर बाचाबाची झाली. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला होता. याबाबत नागपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता; परंतु पोलिसांनी मला जातीवाचक अपशब्द सुनावले आणि लाच मागितली, असा प्रतिआरोप त्यांनी केला होता. कदम यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नाही असे नमूद करून न्यायालयाने त्यांना दोषमुक्त जाहीर केले. महामंडळ गैरव्यवहार प्रकरणात कदम मागील काही वर्षे कारागृहात आहेत. २०१५ मध्ये पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली होती.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top