mhada home
mhada homesakal media

म्हाडा १५ हजार सदनिका उभारणार; अर्थसंकल्प तब्बल १०,७६४.९९ कोटी रुपयांचा

मुंबई : म्हाडाचा २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प (Mhada budget) म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत नुकताच मंजूर झाला. हा अर्थसंकल्प तब्बल १०,७६४.९९ कोटी रुपयांचा असून यात २८८५.९२ कोटींची तूट दर्शवली गेली आहे. या अर्थसंकल्पात म्हाडाच्या विविध प्रादेशिक मंडळांमार्फत राज्यामध्ये वर्षभरात १५ हजार ७८१ घरांचे बांधकाम (House construction) करण्याचे प्रस्तावित आहे. यापैकी ४ हजार ६२३ घरे मुंबईत बांधण्यात येतील.

mhada home
उल्हासनगरातील 1 हजार कॉलेज विद्यार्थ्यांचे राष्ट्रपतींना पोस्टकार्ड

म्हाडा प्राधिकरणाचा २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा आणि २०२१-२२ चा सुधारित ७९७६.७४ कोटींच्या अर्थसंकल्पास सरकारच्या मान्यतेअधीन राहून प्राधिकरणाने मान्यता दिली. २०२१-२२ च्या सुधारित अर्थसंकल्पात १००९.०२ कोटींची तूट दर्शवण्यात आली आहे. २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात प्राधिकरणाच्या मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, कोकण या प्रादेशिक मंडळांतर्फे राज्यात १५ हजार ७८१ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी ७०१९.३९ कोटी रुपयांची तरतूद आहे.

मुंबई मंडळासाठी २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात ३७३८.४० कोटींची तरतूद असून मंडळातर्फे ४६२३ सदनिकांची उभारणीचे प्रस्तावित आहे. मंडळातर्फे बीडीडी चाळी पुनर्विकासासाठी २१३२.३४ कोटी रुपयांची तरतूद आहे. अँटॉप हिल वडाळा येथील गृहनिर्माण योजनेसाठी २९ कोटी, बॉम्बे डाईंग मिल वडाळा योजनेसाठी ६४ कोटी, कोपरी पवई येथील गृहनिर्माण योजनेसाठी १४५.५४ कोटी, मागाठाणे बोरिवली येथील योजनेसाठी ५० कोटी रुपये, खडकपाडा दिंडोशी येथील गृहनिर्माणसाठी १५ कोटी रुपयांची तरतूद आहे. याशिवाय पहाडी गोरेगाव गृहनिर्माणासाठी २५० कोटींची तरतूद केली गेली आहे. सिद्धार्थ नगर (पत्राचाळ), गोरेगाव प्रकल्पासाठी ४३५ कोटी, धारावी पुनर्विकास प्रकल्प टप्पा ब साठी ९१.१८ कोटी, गृहनिर्माण भवन इमारत दुरुस्ती, पुनर्विकासासाठी १५ कोटींची तरतूद केली गेली आहे.

mhada home
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा अटकेत

कोकण मंडळासाठी १९७१ कोटी
कोकण मंडळासाठी या अर्थसंकल्पात १९७१.५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मंडळातर्फे ७ हजार ५९२ सदनिकांची उभारणीचे प्रस्तावित आहे. मंडळातर्फे वर्तक नगर येथील पोलिस वसाहतीच्या पुनर्विकासासाठी २०० कोटींची तरतूद केली गेली आहे. ठाण्यातील मफतलाल येथील भूसंपादन व भूविकासासाठीही १००२.५० कोटींची तरतूद या अर्थसंकल्पात आहे.

पुणे मंडळासाठी ६६४ कोटी
पुणे मंडळासाठी या अर्थसंकल्पात ६६४.३२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मंडळातर्फे १ हजार २५३ सदनिकांचे बांधकाम प्रस्तावित आहे. मंडळाने अर्थसंकल्पात पुण्यातील धानोरी येथे भूसंपादन व भूविकासासाठी ३८० कोटींची तरतूद केली आहे. नागपूर मंडळासाठी या अर्थसंकल्पात ३८८७.९७ कोटींची तरतूद करण्यात आली असून १९५ सदनिकांचे बांधकाम प्रस्तावित आहे. मंडळाने भूसंपादन व भूविकासासाठी १६९.९२ कोटींची तरतूद केली आहे.

औरंगाबाद मंडळासाठी १३६ कोटी
औरंगाबाद मंडळासाठी अर्थसंकल्पात १३६.९० कोटी रुपयांची तरतूद आहे. मंडळातर्फे १७६२ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. नाशिक मंडळासाठी ३५.७२ कोटींची तरतूद केली आहे. यात २२० सदनिकांचे बांधकाम प्रस्तावित आहे. अमरावती मंडळासाठी अर्थसंकल्पात ७५.५७ कोटींची तरतूद असून मंडळातर्फे १३६ सदनिकांचे बांधकाम प्रस्तावित आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com