मध्य रेल्वेची मालवाहतूक सुसाट

मध्य रेल्वेची मालवाहतूक सुसाट

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ ः मध्य रेल्वे गेल्या आर्थिक वर्षात मालवाहतुकीमध्येही अव्वल ठरली आहे. मध्य रेल्वेने आतापर्यंतच्या मालवाहतुकीच्या तुलनेत  २०२१-२२  या आर्थिक वर्षात  ७६.१६  दशलक्ष टन मालवाहतूक करून सर्वोत्कृष्ट कामगिरीची नोंद केली आहे. त्यापैकी मार्च महिन्यात सर्वाधिक ६६१२ वाघिणीची वाहतूक आजवरची दैनिक मालवाहतुकीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली.
 
मध्य रेल्वेने २०२०-२१ मध्ये ६२.०२  दशलक्ष टन मालवाहतूक केली होती. त्यापेक्षा गेल्या आर्थिक वर्षात २२.८ टक्के  अधिक मालवाहतुकीची नोंद झाली. यामध्ये ४०.९  दशलक्ष टन कोळशाची वाहतूक करून कोळसा वाहतुकीत  ३३.३ टक्के ची वाढ नोंद करीत सर्व संबंधित वीजनिर्मिती प्रकल्पांना कोळसा पुरवठा सुनिश्चित केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत सिमेंट वाहतुकीमध्ये  ३१ टक्के  वाढ झाली. ऑटोमोबाईल लोडिंग आर्थिक वर्ष  २०२१-२२  मध्ये  ५२४  रेकपर्यंत वाढले आहे. जे गेल्या वर्षी  २७८  रेक होते. ज्यात  ८९ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. साखरेची वाहतूक गेल्या वर्षीच्या  ३९५  रेकच्या तुलनेत वर्ष  २०२१-२२ आर्थिक वर्षात  १०१२  रेकपर्यंत वाढले. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत लोह आणि पोलाद वाहतूक  ६७ टक्क्यांनी वाढून  ३.१४  दशलक्ष टन झाले आहे. प्रथमच,  मध्य रेल्वेने मालवाहतुकीपासून  ७,३२९.४०  कोटींचा महसूल मिळवला आहे आणि जो गेल्या वर्षीच्या तुलनेत  ३५.०९ टक्क्यांनी अधिक आहे.

बिझनेस डेव्हलपमेंट युनिटनी केलेले कठीण परिश्रम आणि यशस्वी मार्केटिंगमुळे मध्य रेल्वेला ही मोठी उपलब्धी प्राप्त झाली. रेल्वे हे सर्वात सुरक्षित,  जलद,  परवडणारे आणि पर्यावरणपूरक वाहतुकीचे साधन आहे.
- अनिल कुमार लाहोटी,  महाव्यवस्थापक,  मध्य रेल्वे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com