एक्सप्रेस वे वर दोन अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एक्सप्रेस वे वर दोन अपघात
एक्सप्रेस वे वर दोन अपघात

एक्सप्रेस वे वर दोन अपघात

sakal_logo
By
दोन अपघातांत चार जण जखमी एक्स्प्रेस मार्गावर अपघातांची मालिका सुरूच खोपोली, ता. १४ (बातमीदार) : एक्स्प्रेस वेवरील सावरोली टोल नाका ते खंडाळा घाट या दहा किमी अंतरात अपघातांची मालिका सुरूच आहे. शुक्रवारीही या अंतरात दोन भीषण अपघात होऊन चार जण जखमी झाले आहेत. या अपघाताची भयानकता बघता दैव बलवत्तर होते म्हणून जीवितहानी झालेली नाही. पहिला अपघात सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास खंडाळा घाटातील दत्तवाडी येथे पुणे-मुंबई लेनवर घडला. यात तीव्र उतार व वळण रस्त्यावर टँकरचा ब्रेक निकामी झाल्याने अनियंत्रित ट्रॅक्टर पन्नास फूट खोल कोसळला. यात टँकरमधील चालक व अन्य एक जण गंभीर जखमी झाला असून त्यांची नावे समजू शकली नाहीत. दुसरा अपघात साडेआठ वाजता आडोशी उतारावर घडला. ट्रक व टेम्पो यात जोरदार धडक होऊन अपघात घडला. यात लखन सूर्यवंशी (वय २) व प्रवीण आकरे (वय २६, रा. लातूर) हे दोघे जण गंभीर जखमी आहेत. जखमींना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे खंडाळा क्षेत्र वाहतूक पोलिसांनी सांगितले. खोपोली : ट्रक व टेम्पोत घडलेला अपघात. (छायाचित्र : अनिल पाटील)
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top