महाड शहरात पावसाळ्यानंतरची नाले सफाईची कामे सुरु

महाड शहरात पावसाळ्यानंतरची नाले सफाईची कामे सुरु

महाड शहरात पावसाळ्यानंतरची नालेसफाई सुरू पालिकेच्या प्रयत्नांमुळे अस्वच्छता दूर होणार महाड, ता. १२ (बातमीदार) : नाले तुंबल्याने शहरात अस्वच्छता पसरली. यामुळे यंदा महाड पालिकेकडून पावसाळ्यानंतरची नाले आणि गटारांच्या सफाईची कामे सुरू केली आहेत. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. महाड शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याबरोबर कचऱ्याची समस्या वाढत आहे. पालिकेच्या स्वच्छता विभागाने त्यामुळे तातडीने उपाययोजना सुरू केली आहे. गेल्या पावसाळ्यात महापूर आणि पावसाळा लांबल्याने शहरातील नाले आणि गटारांमध्ये कचरा व चिखल साचला आहे. शहरातील कुभारआळी, सरेकर आळी, कोटेश्वरी तळे, काकरतळे, जवाहर नगर सोसायटी, प्रभात कॉलनी, रोहिदास नगर, नवेनगर, सुतार आळी, पानसरे मोहल्ला, खारकांड मोहल्ला, देशमुख मोहल्ला, सुलतान गल्ली, काजळपुरा, कोट आळी, भोई घाट तांबट आळी, चवदार तळे, दस्तुरी नाका, गोमुखी आळी, भीम नगर या प्रमुख वसाहतींतील गटारे आणि नाले साफ करण्याचे काम करण्यात येत आहे. प्रमुख नाला हा लायन्स क्लब इमारत ते भोई घाट असा असून त्याचीही सफाई करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com