election
election sakal media

रायगड : २३५ ग्रामपंचायतींची प्रभाग सीमा निश्चिती अंतिम टप्प्यात

महाड : कार्यकाळ संपलेल्या रायगड (Raigad) जिल्ह्यातील २६० ग्रामपंचायतींच्या प्रभाग सीमानिश्चितीचा (ward border selection) कार्यक्रम अंतिम टप्प्यात आहे. मार्च अखेरपर्यंत हा कार्यक्रम पूर्ण होणार आहे. रायगड जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या आणि जानेवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीमध्ये मुदत संपलेल्या २३५ ग्रामपंचायतींचा निवडणुका (Grampanchayat Election) या वर्षात होण्याची शक्यता वर्तविण्यात येते. या निवडणुकांचे कार्यक्रम राबवण्यास सुरुवात झाली आहे. आरक्षणाचा कार्यक्रम (reservation) चुकीच्या पद्धतीने राबविल्यामुळे निवडणूक कार्यक्रम रद्द केलेल्या ग्रामपंचायतीमधील प्रभाग निश्चितीचा कार्यक्रम सुरू झाला आहे . यामुळे या भागातील राजकीय पक्षाचे कार्यकर्तेदेखील कामाला लागले आहेत.

election
रायगडमध्ये १७२ कोटी रुपयांची थकबाकी; अनेकांचा वीज पुरवठा खंडीत

३१ जानेवारीपासून निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार हा कार्यक्रम राबवला जात आहे. ४ फेब्रुवारीपर्यंत संबंधित तलाठी व ग्रामपंचायतींनी प्रभाग पाडून सीमानिश्चिती केली. त्यानंतर प्रभाग सीमा दाखवणाऱ्या प्रारूप आराखडा तपासणी संबंधित तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत केली जाणार आहे. प्रारूप रचनेचा हा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत याची तपासणी करण्यात येणार आहे. त्यात आवश्यक असलेल्या दुरुस्त्यादेखील करून त्यास मान्यता दिली जाणार आहे.

यानंतर २५ फेब्रुवारीपर्यंत प्रारूप प्रभागरचनेवर हरकती व सूचना मागविण्याची मुदत आहे. सर्व हरकती व सूचना सुनावणीसाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येतील. त्यानंतर अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव पुन्हा जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला जाणार आहे. २९ मार्चला हा प्रभाग सीमानिश्चितीचा कार्यक्रम पूर्ण होणार आहे. त्यानंतर आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल.

प्रभाग निश्चितीवर दृष्टिक्षेप
तालुका संख्या
महाड ७४
उरण १८
रोहा ५
म्हसळा १३
सुधागड १४
अलिबाग ९
तळा १
पनवेल ८
पेण २७
पोलादपूर २०
खालापूर १८
मुरूड ५
श्रीवर्धन १४
कर्जत ९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com