शाळापूर्व तयारीसाठी जिल्ह्यात पालवी प्रकल्प

शाळापूर्व तयारीसाठी जिल्ह्यात पालवी प्रकल्प

बालकांच्या बौद्धिक वाढीसाठी ‘पालवी’ची मात्रा अंगणवाड्यांकडे आकर्षित करण्यासाठी जिल्हा परिषदेचा प्रयत्न अलिबाग, ता. ९ (बातमीदार) : रायगड जिल्ह्यातील तीन ते सहा वयोगटातील मुलांची बौद्धीक क्षमता वाढवण्याबरोबरच शाळांची त्यांना गोडी लागावी यासाठी रायगड जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार ‘पालवी प्रकल्प’ सुरू करण्यात आला आहे. खालापूर तालुक्यात नुकताच प्रायोगिक तत्त्वावर श्रीगणेशा करण्यात आला. या प्रकल्पासाठी जिल्हा परिषद व क्वेस्ट संस्था यांच्यामध्ये करार करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा प्रकल्प व यवतमाळ येथील नेर येथे पालवी प्रकल्प सुरू आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक, चेतन गायकवाड, आशा खेडेकर, क्वेस्ट संस्थेचे व्यवस्थापक नितीन विशे यांनी दौरा केला होता. या वेळी त्यांनी अमरावतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके व यवतमाळचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात यांच्याकडून माहिती घेतली. त्यानुसार रायगड जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर पालवी प्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रकल्पातून तीन ते सहा वयोगटातील मुलांची बौद्धिक व शारीरिक क्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ........................ मुलांना होणार फायदा रायगड जिल्ह्यात तीन हजार २५२ अंगणवाड्या आहेत; परंतु मुलांना अंगणवाडीऐवजी ‘नर्सरी’मध्ये पाठविण्याचा कल वाढल्याने अंगणवाड्यांमध्ये बालके येण्याचे प्रमाण कमी होऊ लागले. पालवी प्रकल्प अंगणवाड्यांमध्ये तीन ते सहा वयोगटातील मुलांची संख्या वाढविण्यास फायदेशीर ठरणार असल्याचा विश्वास जिल्हा परिषदेने व्यक्त केला. ----------- तीन वर्षांवरील मुलांना बडबड गीते, परिसर अभ्यास, कथांची माहिती पालवी प्रकल्पातून चांगल्या पद्धतीने मिळावी यासाठी पालवी प्रकल्प राबवण्यात येत आहे. अंगणवाडीमध्ये मुलांची संख्या वाढावी, मुलांची बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी हा प्रकल्प जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण सभापती यांच्या मार्गदर्शनानुसार सुरू करण्यात आला आहे. - नितीन मंडलीक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, रायगड जिल्हा परिषद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com