पाली नगरपंचायत निवडणुकीत मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी

पाली नगरपंचायत निवडणुकीत मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी

पालीत मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी दुपारपर्यंत ५७ टक्के मतदान पाली, ता. १८ (वार्ताहर) ः पाली नगरपंचायतीच्या चार जागांसाठी मंगळवारी (ता. १८) निवडणूक संपन्न झाली. चार जागांसाठी मतदान होत आहे. त्यामुळे मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी पाहायला मिळाली. तरीही दुपारी अडीचपर्यंत एकूण ५७ टक्के मतदान झाले. चार जागांसाठी १४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. चारही मतदान केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. काही मतदार आपल्या लहानग्यांना सोबत घेऊन मतदानासाठी आले होते. मतदात्यांचा उत्साह चांगला होता. मंगळवारी (ता.१७) २, ५, ८ व १४ या चार प्रभागांचा व २१ डिसेंबरला झालेल्या १३ प्रभागांच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी (ता.१९) लागणार आहे. अष्टविनायकाचे तीर्थक्षेत्र असलेल्या पालीतील ही पहिलीच नगरपंचायत निवडणूक असल्याने ही नगरपंचायत सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची आहे. या निवडणुकीत शिवसेना व भाजप वेगवेगळे लढत होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शेकाप यांनी आघाडी करून निवडणूक लढविली. पालीतील शुद्धपाणी योजना, बाह्यवळण मार्ग, ग्रामीण रुग्णालय, नवीन बस स्थानक, तीर्थक्षेत्र विकास आराखडा अशा महत्वपूर्ण योजना व कामे कित्येक वर्षांपासून जैसे थे आहेत. ... फोटो ओळ, पाली, मतदानासाठी निघालेले मतदार. (छायाचित्र, अमित गवळे) फोटो ओळ, पाली, मतदानासाठी लागलेल्या रांगा मतदार. (छायाचित्र, अमित गवळे) फोटो ओळ, पाली, मतदानासाठी आपल्या लहानग्यांसह आलेले मतदार. (छायाचित्र, अमित गवळे) ...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com