
कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा
कर्जत : तालुक्यातील ताडवाडी येथील आदिवासी महिलेवर प्राणघातक (Attack on tribal woman) हल्ला झाला होता. या प्रकरणातील आरोपीला अद्यापही अटक केली नाही. याविरोधात आदिवासी ठाकूर उन्नती सामाजिक संस्थेकडून सोमवारी (ता. २८) कर्जत पोलिस उपविभागीय कार्यालयावर (Protest at Karjat DYSP Office) मोर्चा काढण्यात आला. या वेळी पोलिस उपविभागीय अधिकारी संजय शुक्ला (Sanjay Shukla) यांना निवेदन देण्यात आले.
हेही वाचा: डोंबिवली : मानपाडा पोलीस ठाण्यात आरोपीचा मृत्यू!
कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथे आदिवासी महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. जागेचा वाद असताना तिथे काम करणाऱ्यांना अडवायला गेलेल्या महिलांवर हल्ला झाला होता. यामध्ये महिला रक्तबंबाळ झाली. पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल झाली आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हा मोकाट असल्याने आदिवासी संघटना आक्रमक झाली आहे. त्या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी कर्जत तालुक्यात आदिवासी संघटनेकडून निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चाला अनेक संघटना, राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता. दरम्यान या वेळी उपस्थित उपविभागीय पोलिस अधिकारी संजय शुक्ला यांनी कारवाईचे आश्वासन दिल्याने मोर्चा स्थगित करण्यात आला.
कर्जत रॉयल गार्डन येथून मोर्चा निघाला. आझाद समाज पार्टी, भीम आर्मी, आरपीआय आठवले गट यांनी सक्रिय सहभाग घेतला. आदिवासी ढोर नाही माणूस हाय, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे.गुंडांना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांचा धिक्कार असो, अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..