कर्जत स्थानकात डब्यांची स्थिती दर्शविणारे फलक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्जत स्थानकात डब्यांची स्थिती दर्शविणारे फलक
कर्जत स्थानकात डब्यांची स्थिती दर्शविणारे फलक

कर्जत स्थानकात डब्यांची स्थिती दर्शविणारे फलक

sakal_logo
By

कर्जत, ता. २४ (बातमीदार) : येथील रेल्वेस्थानकात डब्यांची स्थिती दर्शविणारे फलक बसविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल यांनी केली होती. त्यांच्या या मागणीला अखेर यश आले आहे. स्थानकातील फलाट क्रमांक एकवर सध्या डब्यांची स्थिती दर्शविणारे फलक बसविण्यात आले आहेत.
डब्यांची स्थिती दर्शविणारे फलक नसल्याने कर्जत स्थानकातून गाडी पकडण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होते. पंकज ओसवाल यांनी गेल्या दोन वर्षांपासून यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यावेळी कर्जत रेल्वेस्थानकावर एक्स्प्रेस गाड्याच्या डब्यांची स्थिती दर्शविणाऱ्या छोट्या फलकांची गरजच नाही, असे कळविले होते. ओसवाल यांनी त्यानंतरही पाठपुरावा करून फलकांचे महत्त्व स्पष्ट केले. अखेर रेल्वे प्रशासनाने अशा फलकांना मंजुरी दिली. त्यानुसार स्थानकावर फलाट क्रमांक एकवर फलक बसवले. लवकरच फलाट क्रमांक दोनवरसुद्धा असे फलक बसवण्याचे काम सुरू आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top