केईएममधील रॅगिंग प्रकरणी महापौरांनी दिले कारवाईचे आदेश | Ragging Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kishori pednekar
केईएममधील रॅगिंग प्रकरणी महापौरांनी दिले कारवाईचे आदेश

केईएममधील रॅगिंग प्रकरणी महापौरांनी दिले कारवाईचे आदेश

मुंबई - विद्यार्थ्यावर (Student) झालेल्या रॅगिंगप्रकरणी (Ragging) मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी आज केईएम रुग्णालयाला (KEM Hospital) भेट दिली. संबंधितांवर कायदेशीर कारवाई (Crime) करण्याचे आदेश महापौरांनी (Mayor) दिले. केईएम रुग्णालयातील विद्यार्थ्याच्या रॅगिंगचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज रुग्णालयाला भेट दिली. त्या वेळी महापौरांनी पीडित मुलगा आणि त्याच्या वडिलांची भेट घेतली. त्यांनतर माध्यमांशी बोलताना महापौर पेडणेकर म्हणाल्या, की ‘रॅगिंग प्रकरणातील पीडित मुलगा, ज्यांनी हा प्रकार केला ते आणि केईएम प्रशासनाला समोरासमोर बसवण्यात आले. त्या सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले.

चौकशीअंती या प्रकरणात जे दोषी असतील, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.’ मुंबईतील केईएम रुग्णालयातील एका विद्यार्थ्याने आपल्यावर दोन वर्षांपासून रॅगिंग होत असल्याचा आरोप केला होता. २०१९ आणि २०२० मध्ये आपण लेखी तक्रार करूनही त्याची कुणीही दखल घेतली नाही. याप्रकरणी अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत दोषी विद्यार्थी, वॉर्डन तसेच रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांवर कारवाई करावी, अशी तक्रार पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. संबंधितांवर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुबोध मोरे यांनी दिला आहे.