जोगेश्‍वरीत खोदकामामुळे वाहतूक कोंडी ; खोदकामाकडे पालिकेचे दुर्लक्ष | BMC update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Traffic jam
जोगेश्‍वरीत खोदकामामुळे वाहतूक कोंडी ; खोदकामाकडे पालिकेचे दुर्लक्

जोगेश्‍वरीत खोदकामामुळे वाहतूक कोंडी ; खोदकामाकडे पालिकेचे दुर्लक्ष

जोगेश्‍वरी : जोगेश्‍वरी पूर्वेत (Jogeshwari east) ‍हेमा इंडस्‍ट्रीसमोरील एमएचबी कॉलनीजवळ रस्‍त्‍यावर खोदकाम सुरू असल्‍याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी (traffic jam) होत आहे. येथील सृष्‍टी रेसीडन्‍सी या नवीन इमारतीच्‍या भूमिगत गटराची वाहिनी टाकण्‍यासाठी हे खोदकाम मंगळवारपासून सुरू झाले. हा रस्‍ता अत्‍यंत वर्दळीचा असून अंधेरी रेल्वे स्थानकाकडे (Andheri railway station) जाणार हा एकमेव मार्ग आहे.

त्‍यामुळे दिवसभर या मार्गावर वाहनांची वर्दळ सुरू असते. मंगळवारपासून हा रस्‍ता एका बाजूने खोदून ठेवल्‍याने संपूर्ण भार दुसऱ्या मार्गिकेवर आला आहे. खोदकामाच्या जागेजवळ पालिकेने कोणताही फलक लावलेला नाही. त्‍यामुळे खोदकाम नेमके कसले व किती दिवस चालेल याची माहिती नागरिकांना मिळत नाही. त्यामुळे संबंधितांनी या समस्‍येकडे लक्ष देऊन नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Mumbai NewsBMC