अक्षय आणि सोनाक्षी पुन्हा झळकणार; 'रावडी राठोड २' ची तयारी सुरु | Akshay kumar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akshay kumar And sonakshi sinha
रावडी राठोड २ ची तयारी सुरु

अक्षय आणि सोनाक्षी पुन्हा झळकणार; 'रावडी राठोड २' ची तयारी सुरु

sakal_logo
By

मुंबई : 'रावडी राठोड २' (Rowdy Rathore sequel) ची तयारी सुरू बॉलीवूडमध्ये सुपरहिट ठरलेल्या चित्रपटांचे सिक्वेल येणं ही गोष्ट काही नवीन नाही. अवघ्या काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेता सलमान खानने (Salman khan) त्याच्या बजरंगी भाईजान (Bajrangi bhaijaan Movie) या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली होती. त्यानंतर आता बॉलीवूडचा खिलाडी म्हणजे अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay kumar) २०१२ मधला बहुचर्चित रावडी राठोडचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रभुदेवाने (Prabhu Deva) दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळाला होता. (Rowdy rathore sequel movie preparation starts, akshay kumar and sonakshi sinha in a lead roale)

हेही वाचा: नाताळनिमित्त मुंबईच्या बाजाराला रंगबेरंगी झगमगाट

विशेष म्हणजे रावडी राठोड २ या चित्रपटाची तयारीही सुरू झाल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचे वडील लेखक के. व्ही. विजयेंद्र प्रसाद हे या चित्रपटाच्या स्क्रीप्टवर काम करत आहेत. त्यांनी स्वतः या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रावडी राठोड या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा चित्रपटाच्या सहनिर्मात्या शबिना खान यांनी फार पूर्वीच केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार २०२० मध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार होते, पण कोरोनामुळे हा चित्रपट रखडला होता; मात्र आता हा चित्रपट प्री-प्रॉडक्शनच्या टप्प्यात असून त्याचे काम वेगाने सुरू आहे.

त्यामुळे लवकरच या चित्रपटाचे शुटिंग सुरू केले जाईल, असे बोलले जात आहे. रावडी राठोड २ मध्ये अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा हे दोघे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत, पण दुसऱ्या भागाची कथा पहिल्या चित्रपटाच्या शेवटापासून सुरू होणार नाही. ती त्यापेक्षा वेगळी असेल. दरम्यान, या चित्रपटाचे शूटिंग २०२२ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. त्याआधी अक्षय कुमार आणि सोनाक्षी त्यांच्या आगामी अनेक चित्रपटांचे शूटिंग करताना दिसत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..