christmas
christmas Sakal media

नाताळनिमित्त मुंबईच्या बाजाराला रंगबेरंगी झगमगाट

प्रभादेवी : ख्रिसमस ट्री, जिंगल बेल जिंगल बेलचा सूर लावणाऱ्या सांताक्‍लॉजच्या बाहुल्या, लाल रंगाच्या टोप्या, विद्युत रोषणाई, चॉकलेट व सजावटीच्या (preparation for Christmas celebration) आकर्षक वस्तूंनी मुंबईतील बाजारपेठा (Mumbai Market) सध्या सजल्या आहेत. वर्षाच्या अखेरीस येणारा नाताळ सण (Natal Festival) मोठ्या जल्लोषात आणि उत्साहाने साजरा करण्यासाठी मुंबईकर तयार असले, तरी ओमिक्रॉनच्या सावटामुळे (omicron variant) सरकारने निर्बंध लावले आहेत. (Mumbai market gets colorful because of Christmas festival)

christmas
मुंबई : कैद्यांना विलगीकरणासाठी दिलेल्या शाळा पालिकेने मागीतल्या परत

तरीही नव्या वर्षाचा आनंद घेऊन येणारा हा सण उत्साहात साजरा करण्यासाठी नागरिकांची लगबग बाजारपेठांमध्ये वाढल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे यंदा नाताळ सण सर्व नियम पाळून साजरा केला जाणार आहे, परंतु वर्षातून एकदा येणारा सण असल्याने बाजारपेठांना शोभेच्या वस्तूंनी साज चढला आहे. नाताळ हा सण ख्रिश्चन धर्मियांचा असला, तरी सर्वच धर्मीय उत्साहाने साजरा करतात. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच ख्रिसमस ट्रीपासून ते सांताक्लॉज, खाद्यजत्रा आणि रोषणाईबद्दल आकर्षण असते.

त्यामुळे दरवर्षी शहरातील उत्साही मंडळी खरेदीसाठी बाहेर पडतात. यंदाही हाच उत्साह असून, विशेषतः दादर-परळच्या बाजारपेठेत ग्राहकांची लगबग वाढली आहे. सायंकाळी मोठ्या संख्येने नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. दादर बाजारपेठेत ख्रिसमस ट्री, बेल, रिंग विक्रीसाठी आल्या असून सजवलेल्या आकर्षक अशा ख्रिसमस ट्रीने दादरची बाजारपेठ फुलून गेली आहे. दादर येथील रानडे रोड ते आयडियल गल्लीतील बाजारात विक्रीसाठी आलेल्या ख्रिसमस ट्री, त्याला लावलेले लाल, सोनेरी, चंदेरी बेल्स, रिंग ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

christmas
अभिनेता सोनू सुदच्या नव्या चित्रपटाची घोषणा; जाणून घ्या सविस्तर

पारंपरिक पद्धतीने सजावट केलेल्या ख्रिसमस ट्री, विजेचे तोरण असलेली ख्रिसमस ट्री १०० रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहे. नाताळमध्ये स्टार कंदिलांनाही मागणी असते. प्रत्येक ख्रिस्तीधर्मिय घराबाहेर कंदील लावतो. त्यामुळे विविध रंगीबेरंगी कंदिलांनी दादर रंगीतमय झाले आहे. विविध प्रकारचे विजेची बचत करणारी शोभेची तोरणे बाजारात विक्रीसाठी आली आहेत. त्याचप्रमाणे सजावटीसाठी फ्लॉवर, रिंग, शोभिवंत फुले यांनीदेखील बाजार फुलून गेला आहे. कोट गेल्या वर्षीच्या तुलनेने या वर्षी वस्तूंच्या किमती २० टक्क्यांनी वाढल्या आहेत, परंतु ग्राहकांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून ग्राहक खरेदीकरिता येत आहेत. - राजेश मेहरा, दुकानदार,

दादर गेल्या वर्षी कोरोना निर्बंधांमुळे ख्रिसमस सण उत्साहात साजरा करता आला नाही. या वर्षी निर्बंध शिथिल झाल्याने ख्रिसमस साजरा करता येणार असल्याने उत्साह आहे. विविध वस्तूंची खरेदी करता येणार असून, चर्चमध्येही जाता येणार असल्याने आनंदी आहोत. - सॅविओ लोबो, ग्राहक वस्तू किंमत ख्रिसमस ट्री ८० ते २००० विजेची ख्रिसमस ट्री २००० ते ४००० सॉक्स गिफ्ट बॅग ६० ते २५० टोपी २५ ते ३५ रिंग ३५ ते १०० स्टार कंदील १५० ते ४५० स्टार लाईट ७०० साधे तोरण १८० ते ३५०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com