harry potter return to Hogwarts movie
harry potter return to Hogwarts moviegoogle

''हॅरी पॉटर रिटर्न टू हॉगवर्ट्स''चा ट्रेलर रिलीज

मुंबई : ‘हॅरी पॉटर रिटर्न टू हॉगवर्ट्स''चा (harry potter return to Hogwarts) ट्रेलर रिलीज (Trailer released) जादुई दुनियेची सफर घडवून आणणाऱ्या चित्रपटांपैकी अत्यंत गाजलेला चित्रपट म्हणजे हॅरी पॉटर. हॅरी पॉटर चित्रपटाचे (Harry potter movie) सर्व भाग भरपूर गाजले. आजही कित्येकांच्या स्मरणात हा चित्रपट आणि त्याचे गाजलेले भाग आहेत. आता वीस वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांना या चित्रपटाची जादू अनुभवता येणार आहे. (harry potter return to Hogwarts movie trailer released)

harry potter return to Hogwarts movie
मुंबई : घटस्फोट मागितल्याने पतीने केला पत्नीचा खून

हॅरी पॉटर : रिटर्न टू हॉगवर्ट्स या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. नवीन चित्रपटाचा ट्रेलर पाहून अनेकांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सर्व कलाकारांचे हॉगवर्ट्समधील ग्रेट हॉलमध्ये री युनियन आहे. तसेच ट्रेलरमध्ये चित्रपटातील सर्व कलाकार त्यांचे अनुभव सांगताना दिसत आहेत. हॅरी पॉटरची भूमिका साकारणारा डॅनियल रेडक्लिफ एका गल्लीमधून चालताना दिसतो. पुढे जाऊन त्याला आधी हर्माइनी ग्रेंजर (एम्मा वॉटसन) आणि नंतर रॉन वीजली (रुपर्ट ग्रिंट) भेटतात.

या तिघांव्यतिरिक्त सिनेमाच्या ट्रेलरमध्ये इतर कलाकारही दिसत आहेत. हॅरी पॉटर मालिकेला २० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने १ जानेवारी २०२२ मध्ये खास सेलिब्रेशन होणार आहे. या सेलिब्रेशनचे नाव हॅरी पॉटर : रिटर्न टू हॉगवर्ट्स ठेवण्यात आलं आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एचबीओ चॅनेलवर हे री युनियन आपल्याला पाहता येईल. त्यामुळे हॅरी पॉटर फॅन्स पाहायला अतिशय उत्सुक आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com