Mumbai crimei
Mumbai crimeisakal media

मुंबई : घटस्फोट मागितल्याने पतीने केला पत्नीचा खून

Published on

मुंबई : लग्नानंतर एकमेकांशी पटत नसल्याने पत्नीने पतीकडे घटस्फोट मागितल्याच्या (Wife divorce demand) रागातून पत्नीचा खून (husband kills wife) केल्याची घटना मेघवाडी (Meghwadi) परिसरात नुकतीच घडली. दिलशाद खान (Dilshad khan murder) (वय ३४) असे मृत महिलेचे नाव आहे. आरोपी पती मुन्ना सध्या फरार आहे. (Husband kills his wife because of divorce demand)

Mumbai crimei
प्रीती झिंटाने बाल्कनीमध्ये फुलवली केळ्याची बाग!

पाच वर्षांपूर्वी दिलशादने मुन्नाशी दुसरे लग्न केले होते. सुरुवातीची काही वर्षे चांगली गेल्यानंतर दोन वर्षांपासून दोघांमध्ये वाद व्हायला लागले. किरकोळ बाबींवरूनही त्यांच्यात खटके उडू लागले. त्याला कंटाळून दिलशाद घटस्फोटासाठी मुन्नाकडे आग्रह करू लागली; मात्र मुन्नाला घटस्फोट द्यायचा नव्हता.

दिलशाद दररोज घटस्फोटासाठी तगादा लावत असल्याने अखेर बुधवारी (ता. २२) सकाळी दिलशाद कामावर जायला निघाली, तेव्हा जोगेश्वरी येथील इदगाह मैदानात मुन्नाने धारदार शस्त्राने तिच्यावर वार केले. आजूबाजूच्या लोकांनी दिलशादला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले; परंतु तत्पूर्वी तिचा मृत्यू झाला. दरम्यान, मेघवाडी पोलिसांनी आरोपी मुन्नाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com