आर. जी. हुले यांचा शिवसेनेत प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आर. जी. हुले यांचा शिवसेनेत प्रवेश
आर. जी. हुले यांचा शिवसेनेत प्रवेश

आर. जी. हुले यांचा शिवसेनेत प्रवेश

sakal_logo
By
आर. जी. हुले यांचा शिवसेनेत प्रवेश घाटकोपर, ता. २५ (बातमीदार) ः मुंबई महापालिकेच्या निवडणूक रणधुमाळीला सुरुवात झाली असून पद नियुक्ती, पक्षबांधणीला जोर आला आहे. ईशान्य मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस आर. जी. हुले यांनी शेकडो कार्यकर्त्यांसमवेत शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबई लोकसभा समन्वयक संजय पाटील, विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत भगवी शाल व हातात भगवा झेंडा घेऊन शिवसेनेत प्रवेश केला. शुक्रवारी (ता. २३) सायंकाळी ७ वाजता स्वागतसंबंध हॉल, घाटकोपर पश्चिम येथे पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला. महिला विभाग संघटिका भारती बावदाणे, उपविभागप्रमुख सुनील मोरे, नगरसेवक सुरेश पाटील, नगरसेविका अश्विनी हांडे, माजी नगरसेवक दीपक हांडे आदी उपस्थित होते. ...

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top