मुंबईत दिवसभरात ६३४७ नवीन बाधितांची भर

मुंबईत दिवसभरात ६३४७ नवीन बाधितांची भर

मुंबई, ता. १ : वाढत्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईत नवीन वर्षाच्या पाहिल्याच दिवशी चिंता वाढली आहे. कोरोना रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ झाली असून, यामध्ये ६३४७ नवीन बाधितांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ७,९१,४५७ वर पोचली आहे. तर, सक्रिय रुग्णांची संख्या २२,३३४ झाली आहे. आज बाधित झालेल्या रुग्णांमध्ये ५७१२ जण लक्षणविरहित आहेत. एकाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मुंबईत कोरोनातून बरे झालेल्यांचा दर ९७ हून ९५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मुंबईतील सीलबंद इमारतींची संख्या १५७ एवढी आहे. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी ३८९ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. ९ टक्के रुग्णशय्यांवर रुग्ण दाखल आहेत. शुक्रवारी शून्य मृत्यूची नोंद झाली. आज एक रुग्ण दगावला. मृतांचा एकूण आकडा १६,३७७ वर पोचला आहे. कोविड वाढीचा दर ०.२८ टक्के झाला आहे. आज ४५१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत ७,५०,१५८ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात ४७,९७८ कोविड चाचण्या केल्या गेल्या. आतापर्यंत १,३७,१८,२४० एवढ्या चाचण्या झाल्या आहेत. 

राज्यात ९१७० नवे रुग्ण
आज राज्यात ९१७० नवे कोरोनाबाधित आढळले. रुग्णांचे प्रमाण वाढत असले तरी मृतांचे प्रमाण नियंत्रणात आहे. आज सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मृतांचा एकूण आकडा १,४१,५३३ इतका झाला आहे. औरंगाबाद, लातूर आणि नागपूर मंडळात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. रुग्णांची एकूण संख्या ६६,८७,९९१ झाली आहे. राज्यातील मृत्युदर कमी होऊन २.११ टक्क्यांवर आला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ३२,२२५ इतकी झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com