ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांना ओळखपत्र वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांना ओळखपत्र वाटप
ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांना ओळखपत्र वाटप

ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांना ओळखपत्र वाटप

sakal_logo
By
ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांना ओळखपत्र वाटप खर्डी, ता. ३ (बातमीदार) ः शहापूर पोलिस ठाण्याच्या वतीने शहापूर येथील शेटे सभागृहात तालुक्यातील ४९७ ग्रामसुरक्षा दलाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी उपअधीक्षक पोलिस अधिकारी स्मिता पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे व पोलिस निरीक्षक राजकुमार उपासे यांच्यासह पोलिस पाटील व ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी १०० ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांना ओळखपत्र, टी शर्ट, शिटीचे उपअधीक्षक पोलिस अधिकारी स्मिता पाटील व उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या हस्ते करण्यात आले. या बैठकीचे सूत्रसंचालन खर्डीचे पोलिस पाटील शामबाबा परदेशी यांनी केले. प्रास्ताविक पोलिस शिपाई अंबर कांबळे यांनी केले. बैठक यशस्वी करण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे, पोलिस उपनिरीक्षक एस. बाविस्कर, संतोष तांबोळी यांनी मेहनत घेतली.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top