बदलापूर शहरात आरटीओची जनजागृती

बदलापूर शहरात आरटीओची जनजागृती

बदलापूरमध्ये आरटीओची जनजागृती बदलापूर, ता. ३ (बातमीदार) ः वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, यासाठी आरटीओकडून विशेष जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. बदलापूर पूर्व नगरपालिकेच्या आवारात व पश्चिमेला आरटीओच्या चौकीजवळ ही मोहीम राबवण्यात आली. आरटीओचे कर्मचारी प्रत्येक वाहनचालकांची नोंद करून, नवीन नियमांची यादी त्यांना सोपवत आहेत. शिवाय नियम मोडल्यानंतर पूर्वी आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ केली असल्याचे वाहनचालकांना सांगत आहेत. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पालन करावे, अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रयत्न करावेत, असे आवाहन अंबरनाथ वाहतूक उपविभाग पोलिस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी वाहनचालकांना केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com