उपनगरात कुर्ला, चेंबूर, चुनाभट्टी, भांडुप, विक्रोळी परिसरात सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपनगरात कुर्ला, चेंबूर, चुनाभट्टी, भांडुप, विक्रोळी परिसरात सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी!
उपनगरात कुर्ला, चेंबूर, चुनाभट्टी, भांडुप, विक्रोळी परिसरात सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी!

उपनगरात कुर्ला, चेंबूर, चुनाभट्टी, भांडुप, विक्रोळी परिसरात सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी!

sakal_logo
By
मुंबई उपनगरात सावित्रीबाईंचा जयंती उत्सव चेंबूर, ता. ३ (बातमीदार) ः मुंबई उपनगरातील चेंबूर, माहुल गांव, विक्रोळी, मुलुंड, भांडुप, कुर्ला, चुनाभट्टी परिसरातील विविध सामाजिक संस्था व राजकीय पक्ष, मंडळांच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. चेंबूर येथील निब्बान शैक्षणिक व सामाजिक संस्था व सेव्ह, मंथन महिला मंडळ, व्यापारी संघ, कुकरेजा कम्पाऊंड वाशी नाका, भांडुप येथील छत्रपती शिवाजी महाराज सेवा मंडळ व सोल्ये बौद्ध विकास मंडळ, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), वंचित बहुजन पक्षाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. चेंबूर येथे महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील पोवाड्यांचे गायन केले. ‘सेव्ह’चे सचिव विशाल गायकवाड यांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट उलगडला. या कार्यक्रमाला शिवसेना नगरसेविका अंजली नाईक, कुर्ला एनसीपी मुंबई सचिव कुमुद जयकर, समाजसेविका स्वाती तपासे, रिपब्लिकन पक्षाचे मुंबई संघटक बाळासाहेब बनसोडे, साहेबराव ससाणे, अरुण हुले, चंद्रकला वाटोरे, रमाकांत गवळी, अनिल पोटे विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top