मुंकूद ते ऐरोली मार्गावरील रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट

मुंकूद ते ऐरोली मार्गावरील रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट

मुकुंद ते ऐरोली मार्गावर रिक्षाचालकांकडून लूट प्रवाशांकडून किमान भाडे आकारण्यास नकार वाशी, ता. ५ ( बातमीदार) ः ठाणे-बेलापूर मार्गावरील ऐरोली ते मुकुंद कंपनी येथे जाणाऱ्या रिक्षाचालकांकडून सध्या प्रवाशांची लूट सुरू आहे. ऐरोली रेल्वे स्थानकात असणाऱ्या रिक्षा दिघ्याकडे जाणाऱ्या प्रवाशांकडून १५ रुपये घेतात. तर मुकुंद, कळव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांकडूनही रेल्वे स्थानकाबाहेरून १५ ते २० रुपये भाडे घेतले जाते. या मार्गावरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, ऐरोली रेल्वे स्थानक ते मुकुंद या मार्गावर राजकीय पक्षांनी रिक्षा युनियनची उभारून त्‍यांच्या माध्यमातून पैसे गोळा करण्याचा नवा पायंडा पाडला आहे. याकडे आरटीओचे आणि वाहतूक शाखेचे दुर्लक्ष होत असल्‍याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येत आहे. ऐरोली रेल्वे स्‍थानक परिसरातून शेअर रिक्षा चालक प्रत्येकी १५ रुपये प्रवासी भाडे आकारतात. त्यामुळे प्रवासी भाडेवाढीने त्रस्त आहेत. ऐरोली बस डेपो ते मुकुंद कंपनी या मार्गावरून ऐरोली नाका, ऐरोली स्‍थानक, दिघा, मुकुंद कंपनी अशा चार टप्प्यात शेअर रिक्षा धावतात. कळवा आणि विटावा परिसरातील नागरिक थेट ऐरोलीमध्ये येण्यासाठी पर्यायी मार्ग वापरतात. तर ऐरोली येथून दिघा, रामनगरकडे जाण्यासाठी दैनंदिन हजारो नागरिक या रिक्षाचा आधार घेतात. त्यातच माईंड स्पेस आणि अक्षरा या कंपन्याचे कर्मचाऱ्यांनाही रिक्षा प्रवासच सोयीचा होतो. किमान भाडे १० रुपये भाडे नियोजित असताना देखील रिक्षाचालक थेट दिघा आणि मुकुंदकडे जाणाऱ्या प्रवाशांकडून १५ रुपयांची भाडे आकारणी करत आहे. ही भाडे वाढ सीएनजीचे दर वाढल्यामुळे वाढत असल्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. रिक्षाच्या भाडेदरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. मनमानी पद्धतीने रिक्षाचे दर वाढविले असल्‍यास संबंधित रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येईल. - हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन, अधिकारी शेअर रिक्षा चालकांकडून लूटमार शेअर रिक्षाचालकांकडून किमान १० रुपये भाडे घेणे अपेक्षित आहे. शिवाय नियमितपणे ३ प्रवासी घेणे बंधनकारक असताना या मार्गावरील रिक्षाचालक सर्रास ४ ते ५ प्रवासी घेऊन वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करीत आहे. आता रिक्षाचालक शेअरिंगसाठी १५ रुपये आकारत आहेत. रात्रीच्या वेळेला रिक्षाचालक शेअर रिक्षा नसल्याचे कारण सांगत मुकुंद आणि दिघ्याकडे जाणाऱ्या प्रवाशांकडून दुप्पट भाडे आकारणी करतात. वाशी ते कोपरखैरणे मार्गावर देखील किमान २० ते २५ रुपये भाडे आकारून प्रवाशांची लूटमार सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com