झेडपीच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता पदी अर्जुन गोळे

झेडपीच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता पदी अर्जुन गोळे

जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंतापदी अर्जुन गोळे ठाणे, ता. ४ ः जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंतापदी अर्जुन मारुती गोळे यांची सोमवारी नियुक्ती झाली. यापूर्वी ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जल व्यवस्थापन विभाग पनवेल येथे सहायक अभियंता श्रेणी १ पदी कार्यरत होते. गोळे हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन नोव्हेंबर २०१६ मध्ये सेवेत रुजू झाले. त्यांनी परिवेक्षाधीन कालावधीत जिल्हा परिषद गडचिरोली येथे काम केले आहे. ते मूळचे सातारा जिल्ह्यातील गवडी गावचे रहिवासी असून त्यांनी एम.ई. स्ट्रक्चर (स्थापत्य) या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे; तर शिवाजी विद्यापीठातून बी.ई. सिव्हिल ही पदवी पूर्ण केली आहे. गोळे यांनी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली जल जीवन मिशन अभियानाला गतिमानता आणण्यासाठी प्राधान्याने काम करणार असल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com