वसई विरार महापालिकेत अजिंक्य बगाडे अतिरिक्त आयुक्तपदी

वसई विरार महापालिकेत अजिंक्य बगाडे अतिरिक्त आयुक्तपदी

अतिरिक्त आयुक्तपदी अजिंक्य बगाडे वसई, ता. ४ (बातमीदार) ः वसई-विरार पालिकेचे उपायुक्त अजिंक्य बगाडे यांची अतिरिक्त आयुक्तपदावर प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. याविषयी नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी यांनी पत्र काढले आहे. महापालिकेचे आयुक्त गंगाथरन डी. यांची बदली झाल्याने यापुढे प्रशासकीय कारभार सांभाळण्यासाठी नगरविकास विभागाने अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक केली आहे. बगाडे हे महापालिकेत उपायुक्तपदावर असताना घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता विभाग आदी जबाबदारी सांभाळत होते. बगाडे यांच्या नियुक्तीने आता वसई-विरार पालिकेला दोन अतिरिक्त आयुक्त मिळाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com