अतिक्रमण उपायुक्त अश्विनी वाघमळे यांची बदली

अतिक्रमण उपायुक्त अश्विनी वाघमळे यांची बदली

अतिक्रमण उपायुक्त अश्विनी वाघमळे यांची बदली सकाळ वृत्तसेवा ठाणे, ता. ४ ः ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण उपायुक्त अश्विनी वाघमळे यांची अचानक बदली करण्यात आली आहे. त्यांना सहायक आयुक्त नगर संचालक, मुंबई या ठिकाणचा पदभार देण्यात आला आहे. कार्यालयीन कामकाजाचा भाग म्हणून त्यांची बदली करण्यात आली असल्याचे कारण देण्यात आले आहे. असे असले, तरी त्यांचा कार्यकाळ संपण्याच्या आधीच बदली झाल्यामुळे प्रशासनातीलच काही अधिकाऱ्यांच्या नाराजीमुळे ही बदली करण्यात आली असल्याची चर्चा सध्या पालिका वर्तुळात सुरू झाली आहे. वाघमळे यांच्या कार्यकाळात अनधिकृत बांधकामांवर काही प्रमाणात कारवाईदेखील सुरू झाली होती; तर तत्कालीन आयुक्तांच्या कार्यकाळात झालेल्या अनधिकृत बांधकामांचा अहवाल तयार करण्याचे कामदेखील त्यांच्याकडे होते. हा अहवाल अंतिम टप्प्यात असताना त्यांची आता अचानक बदली झाली. यासंदर्भात अश्विनी वाघमळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आपल्याला कुठेही काम करायचे असून कामाच्या बाबतीत आपण प्रामाणिक भावनेनेच काम केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com