सम्यक समता प्रतिष्ठानचे क्रांतिज्योती पुरस्कार जाहीर

सम्यक समता प्रतिष्ठानचे क्रांतिज्योती पुरस्कार जाहीर

सम्यक समता प्रतिष्ठानचे क्रांतिज्योती पुरस्कार जाहीर संध्या दोशी, दीपशिखा वारे, डॉ. ज्योत्स्ना पवार, आशा ब्राह्मणे मानकरी मुंबादेवी, ता. ५ (बातमीदार) : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त चारकोप येथील सम्यक समता प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, महिला पोलिस, कायदेतज्ज्ञ, पत्रकारिता, महिला संघटन अशा विविध क्षेत्रांतील कर्मयोगी महिलांचा दरवर्षी क्रांतिज्योती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. प्रथम वर्षाचे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. शिवसेनेच्या नगरसेविका व शिक्षण समितीच्या अध्यक्षा संध्या विपुल दोशी, महिला पोलिस निरीक्षक दीपशिखा वारे, डॉ. ज्योत्स्ना पवार, आशा अशोक ब्राह्मणे आदी मान्यवरांना ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत ‘आयदान’कर उर्मिलाताई पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. हा पुरस्कार सोहळा रविवारी (ता. ९) जेतवन सांस्कृतिक केंद्र, बुद्धविहार, चारकोप, कांदिवली येथे होणार आहे. कोविड नियमांचे पालन करीत नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे सचिव सी. ओ. ढिवरे यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरुण साळवी, अशोक कांबळे, रमेश गणवीर, रवींद्र गजभिये, मिलिंद खरात, मधुकर ननावरे, भाऊसाहेब केदार आदी मान्यवर परिश्रम घेत आहेत. ...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com