"स्टोन आर्ट" मधून सिंधुताई सकपाळ यांना आदरांजली

"स्टोन आर्ट" मधून सिंधुताई सकपाळ यांना आदरांजली
‘स्टोन आर्ट’मधून सिंधूताई सकपाळ यांना आदरांजली ठाणे, ता. ५ (बातमीदार) : ‘अनाथांची माय’ अशी ओळख प्राप्त झालेल्या ज्येष्ठ समाजसेविका, पद्मश्री सिंधूताई सकपाळ यांच्या अकाली निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मंगळवारी रात्री उशिरा सिंधूताईंच्या निधनाची बातमी समोर येताच अनेकांनी सोशल मीडिया तसेच विविध माध्यमांतून माईं सोबतचे प्रसंग आणि आठवणी शेअर करून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. ठाणे शहरातील चित्रकार सुमन दाभोलकर यांनीदेखील सिंधूताई सकपाळ यांना ‘स्टोन आर्ट’च्या माध्यमातून आदरांजली वाहिली. सुमन हे नदीकाठी सापडणाऱ्या दगडांचा आकार न बदलता त्यावर रंगांची उधळण करून व्यक्तींची हुबेहूब चित्र रेखाटतात. अशाच एका दगडावर त्यांनी सिंधूताईंच्या चेहऱ्यावरील हावभाव टिपून हुबेहूब प्रतिमा रेखाटली आहे. यापूर्वी त्यांनी जनरल बिपीन रावत, सावित्री बाई फुले, अमिताभ बच्चन, पी. व्ही. सिंधू, नरेंद्र मोदी, महेंद्र सिंह धोनी, उद्धव ठाकरे, इंदिरा गांधी, अब्दुल कलाम, छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले अशा अनेक मान्यवरांची स्टोन आर्ट पोट्रेट साकारली आहेत. सर्वाधिक स्टोन आर्ट पोट्रेट साकारल्याबद्दल सुमन दाभोलकर यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. अनाथांची माय सिंधूताई सपकाळ गेल्याची बातमी मंगळवारी रात्री उशिरा कळाली. ज्यांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य अनाथ मुलांसाठी समर्पित केलं. त्यांच्या जाण्याने एक माणूस, एक कलाकार म्हणून त्यांना माझ्या स्टोन आर्टमधून आदरांजली वाहण्याचा मी प्रयत्न केला आहे. - सुमन दाभोलकर, चित्रकार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com