अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेणाऱया आरोपीला अहमदनगर मधून अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेणाऱया आरोपीला अहमदनगर मधून अटक
अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेणाऱया आरोपीला अहमदनगर मधून अटक

अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेणाऱया आरोपीला अहमदनगर मधून अटक

sakal_logo
By
मुलीला फूस लावून पळविणाऱ्यास अटक नवी मुंबई (वार्ताहर) : उरण भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवणाऱ्या अनिल साळुंखेला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने अहमदनगर एमआयडीसी भागातून मुलीसह ताब्यात घेतले. मुलीला पालकांच्या स्वाधीन केले असून साळुंखेला कारवाईसाठी उरण पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. अल्पवयीन मुलगी उरण परिसरात राहत असून काही महिन्यांपूर्वी पीडित मुलीची त्याच परिसरात राहणाऱ्या अनिल साळुंखे याच्यासोबत मैत्री झाली होती. साळुंखेने तिला फूस लावून १८ डिसेंबर रोजी अहमदनगर येथे पळवून नेले होते. मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने तिच्या आई-वडिलांनी उरण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला होता. दुसरीकडे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने गुन्हे शाखेचे पोलिस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तांत्रिक तपासाद्वारे माहिती काढली असता, मुलगी व साळुंखे दोघेही अहमदनगर एमआयडीसी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दोघांना ताब्यात घेण्यात आले.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top