एक अवैध एलईडी, दोन पर्ससीन नौका अलिबागमध्ये कारवाई

एक अवैध एलईडी, दोन पर्ससीन नौका अलिबागमध्ये कारवाई

एक अवैध एलईडी, दोन पर्ससीन नौका अलिबागमध्ये कारवाई मालाड, ता. ५ (बातमीदार) ः नवीन सागरी मासेमारी कायद्याला नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य विधिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर राज्य सरकारचा मत्स्यव्यवसाय विभाग अवैध मासेमारीविरोधात कमालीचा सक्रिय झाला असून सिंधुदुर्गनंतर आता रायगड जिल्ह्यातही एलईडी आणि अवैध मासेमारी विरोधात मत्स्य विभागाने मोहीम हाती घेतली आहे. आज (ता. ५) मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त महेश देवरे यांनी एक अवैध एलईडी व दोन अवैध पर्ससीन नौका पकडल्या. या तिन्ही नौकांवर सुधारित कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. नवीन कायद्यानुसार एलईडी वापरल्यास पहिल्या उल्लंघनासाठी ५ लाख दंड व नौका, जाळे व इतर साहित्य जप्त करण्याचे प्रावधान आहे, तर अवैध पर्ससीन मासेमारी केल्यास पहिल्या उल्लंघनासाठी एक लाख रुपये दंडाचे प्रावधान आहे. नवीन मासेमारी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे व केलेल्या कारवाईचा अहवाल दररोज सादर करण्याचे आदेश मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी सातही सागरी जिल्ह्यांच्या सहायक मत्स्य आयुक्तांना दिले आहेत. मागील काही दिवसांमध्ये अवैध पर्ससीन व एलईडीविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कारवाई केल्यानंतर अन्य सागरी जिल्ह्यांमध्येही मत्स्यव्यवसाय विभाग सक्रिय झाला आहे. ...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com