मुंबई पालिकेच्या आणखी दोन प्रभागांचे विभाजन

मुंबई पालिकेच्या आणखी दोन प्रभागांचे विभाजन

आणखी दोन प्रभागांचे पालिका करणार विभाजन प्रशासनाची गटनेत्यांना शिफारस सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ५ : मुंबई महापालिकेच्या आणखी दोन प्रभागांचे विभाजन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तशी शिफारसही प्रशासनाने गटनेत्यांना केली आहे. त्यानुसार अंधेरी पूर्व आणि कुर्ला अशा दोन प्रभागांचे विभाजन होणार आहे. त्यापूर्वी मालाड पी उत्तर प्रभागाच्या विभाजनाची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली होती. त्यामुळे आता मुंबईतील प्रभागांची संख्या २४ वरून २७ होणार आहे. मुंबईतील काही प्रभागांची हद्द मोठी असल्याने त्यांचे प्रशासकीयदृष्ट्या नियोजन करण्यावर अनेक अडथळे येत होते. नागरिकांनाही त्याचा त्रास होत होता. त्यामुळे काही वर्षांपूर्वी महापालिकेने प्रभागांचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला होता. लोकसंख्या, प्रभाग, क्षेत्रफळ तसेच समस्यांचा अभ्यास करण्यासाठी सहआयुक्त भारत मराठे आणि सुनील धामणे यांची द्विसस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती. समिताने अंधेरी के-पूर्व आणि कुर्ला-एल विभागाचे विभाजन व पुनर्रचना करण्याचा अहवाल सादर केला असून तो गटनेत्यांच्या बैठकीत मांडण्यात आला आहे. मुंबईच्या एकूण लोकसंख्येनुसार पालिकेतील प्रभागांच्या बदलण्यात आलेल्या पुनर्रचनेमुळे विभाग कार्यालयांचे विभाजन/पुनर्रचना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. -------- एल-पूर्व उपनगरात एल-कुर्ला हा सर्वात मोठा प्रशासकीय विभाग असून लोकसंख्या आठ लाख ९९ हजार ४२ आहे. १६ नगरसेवक आहेत. या विभागाचे विभाजन करून प्रस्तावित ‘एल/दक्षिण’ व ‘एल/उत्तर’ असे दोन प्रभाग बनवले जातील. त्यामध्ये एल-दक्षिण विभागाचे कार्यालय कुर्ला येथे असलेल्या विद्यमान जागेत तर एल-उत्तर विभागाचे कार्यालय चांदिवली येथील उप प्रमुख अभियंता, इमारत प्रस्ताव विशेष कक्ष, एमसीएमसीआर कार्यालयाच्या इमारतीत बनवण्यात येणार आहे. ---- के पूर्व - विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी पूर्वचा भाग असलेल्या अंधेरी/के-पूर्व विभागाची लोकसंख्या आठ लाख २३ हजार ८५ इतकी असून १५ नगरसेवक आहेत. के-दक्षिण व के-उत्तर असे दोन प्रभाग करण्याचे प्रस्तावित आहे. सध्याचे के-पूर्व विभागाचे प्रशासकीय कार्यालय के-दक्षिण म्हणून कार्यरत राहणार असून के-उत्तर नवीन कार्यालयासाठी जागेचा शोध सुरू आहे. मालाडचे विभाजन प्रतीक्षेत मालाड पूर्व पी उत्तर प्रभागाचे विभाजन करण्याची घोषणा करण्यात आली होती. या प्रभागात तब्बल १८ नगरसेवक आहेत. त्यामुळे मालाडच्या प्रभागाचे विभाजन करण्यात येणार होते. मात्र, अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com