कंगनाविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यास नकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंगनाविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यास नकार
कंगनाविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यास नकार

कंगनाविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यास नकार

sakal_logo
By
कंगनाविरोधात अजामीनपात्र वाॅरंट जारी करण्यास नकार सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ५ : गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात अभिनेत्री कंगना राणावतविरोधात अजामीनपात्र वाॅरंट जारी करण्यास अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने आज नकार दिला. अभिनेता हृतिक रोशनसंबंधित मुलाखतीमध्ये अख्तर यांच्याबाबत कंगनाने विधाने केली होती. याविरोधात अख्तर यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. न्यायालयात यावरील पुढील सुनावणी १ फेब्रुवारीला होणार आहे. अख्तर यांच्या वतीने अॅड. जय भारद्वाज काम पाहत आहेत. कंगनाने आधारहिन आरोप केले असून त्यामुळे माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी झाली आहे, असे या तक्रारीत म्हटले आहे. हा खटला अन्य न्यायालयात वर्ग करण्याची मागणी कंगनाने सत्र न्यायालयात यापूर्वी केली होती; मात्र ती अमान्य करण्यात आली आहे.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top