बुली बाई प्रकरणात आणखी एक तरुणाला अटक

बुली बाई प्रकरणात आणखी एक तरुणाला अटक

‘बुलीबाई’ ॲप प्रकरणात आणखी एका तरुणाला अटक उत्तराखंडमधून घेतले ताब्यात सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ५ ः बुलीबाई ॲप प्रकरणात आज पुन्हा एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातली ही तिसरी अटक आहे. तिसऱ्या तरुणालाही उत्तराखंडमधूनच अटक करण्यात आली आहे. मयांक रावत असे आरोपीचे नाव आहे. तो २० वर्षांचा आहे. विशाल कुमार झा (२१) आणि श्वेता सिंग (१८) यांच्यानंतर तिसऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मयांकची उत्तराखंडच्या न्यायालयातून ट्रान्झिट रिमांड घेण्यात येणार असून त्यानंतर त्याला मुंबईत आणले जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्वेता सिंग बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती. ती अभियांत्रिकीची तयारी करत आहे. पोलिसांच्या रडारवर असलेले आरोपी प्रत्यक्ष एकमेकांना भेटलेले नाहीत. मात्र ते सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करत होते. त्यामुळे ते सर्व काम एकत्रित करत होते की नाही, याचा पोलिस तपास करत आहेत. आज झालेल्या पत्रकार परिषदेत मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी माहिती दिली. पाच ट्विटर अकाऊंट बुलीबाई प्रकरणात पाच ट्विटर अकाऊंट पोलिसांना मिळाले आहेत. त्यापैकी तीन अकाऊंट श्वेता सिंग चालवत होती. एक अकाऊंट विशाल कुमार झा चालवत होता. ३१ डिसेंबर २०२१ रोजी गिटहबवर बुलीबाई ॲप अपलोड करण्यात आले. त्याच दिवशी श्वेताने ट्विटरवर बुलीबाई नावाचे अकाऊंट तयार केले. १ तारखेला त्याविरोधात दिल्लीत तक्रार दाखल करण्यात आली. २ तारखेला मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. बुलीबाई ट्विटरला फॉलो करणारे काही अकाऊंट पोलिसांना मिळाले आहेत. शीख आणि मुस्लिम समुदायाला एकत्र टार्गेट करण्याचा प्रयत्न पोलिसांना जे पाच ट्विटर अकाऊंट मिळाले आहेत ज्यावरून मुस्लिम महिलांना टार्गेट करण्यात येत होते, त्या सर्वांची नावे शीख समुदायाशी जोडलेली होती. बुलीबाई ट्विटर हॅण्डलच्या माहितीमध्ये ते अकाऊंट केएसएफ (खालसा शीख फोर्स) नावाने तयार केले असल्याचे भासवण्यात आले होते. खालसा सुप्रीमिस्ट नावाचं अकाऊंट बुलीबाईला फॉलो करत होते. ते विशालकुमार झा चालवत होता. त्याचे लोकेशन कॅनडा दाखवण्यात आले होते. अशा प्रकारे शीख समुदायांच्या नावाने अकाऊंटस् तयार करून मुस्लिम महिलांना टार्गेट करण्यात येत होते. एका दिवसात बुलीबाई ॲपमध्ये जवळपास १०० मुस्लिम महिलांना टार्गेट करण्यात आले होते. त्यामुळे दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी हे सगळे घडवून आणले आहे का, याचा पोलिस तपास करत आहेत. नेपाळ कनेक्शन सर्व प्रकरणात एक व्यक्ती नेपाळमध्ये बसून श्वेता सिंगला काम करायला सांगत होता, अशीही माहिती आहे. त्यात किती तथ्य आहे, याचा तपास पोलिस करत आहेत. विशालकुमार झाला अटक झाल्यानंतर Giyou44 ट्विटर अकाऊंटवरून या प्रकरणाची जबाबदारी घेण्यात आली आहे. अटक केलेल्या तरुणांचा यात काही दोष नाही. मी त्यांचे अकाऊंटस् चालवत होतो, असे या ट्विटर अकाऊंटवरून सांगण्यात आले आहे. या अकाऊंटचा पोलिस तपास करत आहेत. संपूर्ण प्रकरणात पैशांची देवाणघेवाण झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे जर या तरुणांकडून हे काम दुसरे कुणी करून घेत असेल तर हे व्यवहार क्रिप्टोकरन्सीमध्ये झालेले असल्याचा पोलिसांना संशय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com