मालमत्ता करात सुट देण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालमत्ता करात सुट देण्याची मागणी
मालमत्ता करात सुट देण्याची मागणी

मालमत्ता करात सुट देण्याची मागणी

sakal_logo
By
मालमत्ता करात कल्याण-डोंबिवलीकरांना दिलासा देण्याची मागणी डोंबिवली, ता. ६ ः राज्य सरकारने मुंबई, ठाणे, नवी मुंबई महापालिका हद्दीतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करत दिलासा दिला आहे. याच धर्तीवर एमएमआर रिजनमध्ये येणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिकेतील घरांसाठीही हा निर्णय घेऊन येथील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. हा निर्णय येथे लागू झाल्यास महापालिका हद्दीतील ४० टक्के कुटुंबांना याचा लाभ मिळू शकतो, असे म्हात्रे यांनी सांगितले. सर्वसामान्य चाकरमानी वर्ग हा ठाणेपल्याड म्हणजेच कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहरात राहत आहे. येथून ते मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात कामानिमित्त जातात. राज्य सरकारने मुंबई, ठाणे, नवी मुंबई महापालिका हद्दीतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना यापुढे मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. एमएमआर रिजन क्षेत्रात या महापालिका येतात, त्याचप्रमाणे याच क्षेत्रात कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या महापालिकादेखील येतात. त्यामुळे या महापालिका क्षेत्रातदेखील हा निर्णय लागू करण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top