ठाण्यात समुह संसर्गचा धोका वाढला, इमारती पुन्हा होणार सिल ठाण्यात समुह संसर्गचा धोका वाढला, इमारती पुन्हा होणार सिल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात समुह संसर्गचा धोका वाढला, इमारती पुन्हा होणार सिल
ठाण्यात समुह संसर्गचा धोका वाढला, इमारती पुन्हा होणार सिल
ठाण्यात समुह संसर्गचा धोका वाढला, इमारती पुन्हा होणार सिल ठाण्यात समुह संसर्गचा धोका वाढला, इमारती पुन्हा होणार सिल

ठाण्यात समुह संसर्गचा धोका वाढला, इमारती पुन्हा होणार सिल ठाण्यात समुह संसर्गचा धोका वाढला, इमारती पुन्हा होणार सिल

sakal_logo
By
ठाण्यात समूह संसर्गाचा धोका वाढला १०० जणांच्या चाचणीत २० बाधित; इमारती पुन्हा सील होणार सकाळ वृत्तसेवा ठाणे, ता. ६ ः नववर्षापासून डोके वर काढलेल्या कोरोनाचा धोका वाढताच ठाणे शहरात चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. गेल्या पाच दिवसांत २३ हजार संशयितांच्या चाचण्या झाल्या असून, त्यामध्ये साडेचार हजारपेक्षा अधिक रुग्ण बाधित आढळले आहेत. म्हणजे दर १०० चाचण्यांपैकी २० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. त्यामुळे ठाणे शहरात कोरोनाच्या कम्युनिटी स्प्रेड अर्थात समूह संसर्गाला सुरुवात झाली असून, धोका टाळण्यासाठी पालिकेने आता एकाच ठिकाणी १० बाधित आढळल्यास पुन्हा इमारती सील करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून ठाणे पालिका क्षेत्रात ५० पर्यंत आटोक्यात आलेली कोरोना रुग्णसंख्या आता हजारांच्या घरात झेपावली आहे. बुधवारी (ता. ५) जिल्ह्यातील सर्वाधिक एक हजार ५८५ बाधितांची नोंद ठाणे महापालिका क्षेत्रात झाली. गेल्या पाच दिवसांपासून हा आलेख असाच चढताच आहे; तर दुसरीकडे काही दिवसांपासून थंडावलेल्या चाचण्याही वाढवण्यात आल्या आहेत. सर्दी, खोकला, ताप असलेल्या रुग्णांना कोविड चाचणी करण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. काही जागरुक नागरिक स्वतःहून चाचण्या करत आहेत. परिणामी १ जानेवारीपासून तीन हजार चाचण्यांची संख्या साडेसात हजारच्या घरात पोहोचली आहे. चिंतादायक बाब म्हणजे चाचणीत २० टक्के संशयित बाधित आढळत आहेत. संपर्कातील नागरिक विलगीकरणात कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाचा सामना करण्यासाठी बुधवारी (ता. ५) अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी सर्व प्रभागातील सहायक आयुक्तांची तातडीची बैठक घेतली. सर्वाधिक कमी किंवा शून्य रुग्णसंख्या असलेल्या मुंब्रा, दिव्यातही बाधित वाढत असल्याने सर्वच प्रभागांत पुन्हा कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या. याशिवाय एखाद्याला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेऊन त्यांनादेखील विलगीकरणात ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुपटाची दर वाढला १) तिसऱ्या लाटेला ठाण्यात सुरुवात झाली आहे की नाही याचे ठाम स्पष्टीकरण पालिकेने दिले नसले, तरी समूह संसर्गाला सुरुवात झाली आहे. त्यात ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्याही २२ झाल्याने धोका वाढला आहे. २) कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना ठाण्यातील रुग्णदुपटीचा दरही कमी होत आहे. गेल्या पाच दिवसांत ७२८ वरून हा दार १४० वर आला आहे. म्हणजे रुग्णदुपटीचा वेग वाढला असून आठवड्याचा दर ०.३ वरून ०.३७ टक्क्यांवर आला आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर सद्यस्थितीत एखाद्या इमारतीत ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्यास ती इमारत सिल केली जात आहे, परंतु आता पहिल्या लाटेच्या वेळी जशा इमारती सील होत होत्या, तसेच चित्र पुन्हा ठाण्यात पाहायला मिळणार आहे. ज्या इमारतीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या १ ते १० च्या घरात आहे, ती इमारतदेखील सील करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिल्या आहेत. ़कंटेन्मेंट झोन कन्टेन्मेंट झोनची यादी तयार करून त्यानुसार त्या त्या भागात कडक निर्बंध लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय परदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची माहिती, त्याचा इतिहास, तो कुठून आला, कुठे जाणार आहे याची माहितीदेखील घेऊन त्याच्यावर देखरेख ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तारीख चाचण्या बाधित डबलिंग रेट रिकव्हरी रेट १ जाने. ३१८८ ३३६ ७२८ ९७.७३ टक्के २ जाने. ३४०४ ५८० ३८३ ९७.११ टक्के ३ जाने. ३५३४ ६९८ २८६ ९६.६८ टक्के ४ जाने. ५५१४ १३३२ १९४ ९५.८४ टक्के ५ जाने. ७४७४ १५८५ १४० ९४.३० टक्के
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top