सुरक्षा रक्षकाकडे संकुलाची वीजबिले

सुरक्षा रक्षकाकडे संकुलाची वीजबिले

सुरक्षा रक्षकाकडे संकुलाची वीजबिले मेघमल्हार संकुलात महावितरणचा कारभार घणसोली, ता. ६ (बातमीदार) : घणसोलीतील मेघमल्हार संकुलातील १५०० नागरिकांच्या विजेची बिले सुरक्षा रक्षकाकडे सोपवण्यात आली आहे. महावितरणकडून ग्राहकांना वीज बिले न सोपवल्याने संताप व्यक्त करण्यात आला आहे. कंपनी बेजबाबदारपणे वागत असल्याचे कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे. घणसोलीत सिडकोकडून मेघमल्हार संकुलाची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी १५ इमारती असून त्यामध्ये महावितरणचे १५०० ग्राहक राहत आहेत. मागील दोन महिन्यांपासून महावितरणच्या बिलांचे वाटप करणारी एजन्सी सोसायटीनुसार न देता सुरक्षा रक्षकाकडे सर्व बिले देत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या वीजबिलांचे वर्गीकरण न करता संपूर्ण बिलांचा गठ्ठा सुरक्षा रक्षकाकडे देण्यात आला आहे. या गठ्ठ्यातून आपले बिल कसे शोधायचे, हा प्रश्‍न ग्राहकांना पडला आहे. संकुलातील १५०० बिलांची ग्राहकांनुसार वर्गवारी करून त्यांना पोहोचवण्यासाठी साधारणतः पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागतो. यात ग्राहकांना मनस्ताप होत असून घरापर्यंत वीज बिल पोहचेपर्यंत भरणा करण्याची मुदत संपलेली असते. उशिरा वीज बिल भरणा केल्यास कंपनीकडून विलंब शुल्क आकारण्यात येते; मात्र ग्राहकापर्यंत आठ दिवस बिल पोहोचल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, अशी विचारणा करण्यात आली. कोट मागच्या महिन्यापासून घणसोलीतील मेघमल्हार संकुलात १५०० वीजबिले एकत्रितरीत्या येत आहेत. आपले बिल शोधायला एका रहिवाशाला अर्धा ते एक तास लागत आहे. महावितरणचा हा बेजबाबदार कारभार रहिवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे. - राजस कुमार, ग्राहक संबंधित एजन्सीशी संपर्क करून वीजबिलाच्या बेजबाबदार कारभाराविषयी ताकीद देण्यात आली आहे. या एजन्सीला दंडात्मक कारवाईचे पत्र पाठवण्यात आले आहे. - धीरज बिराजदार, सहायक अभियंता, महावितरण घणसोली : सुरक्षा रक्षकाकडे सोपवण्यात आलेला वीजबिलांचा गठ्ठा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com