तिसऱ्या लाटेत मुंबई पालिकेचे १७२ कर्मचारी बाधित

तिसऱ्या लाटेत मुंबई पालिकेचे १७२ कर्मचारी बाधित

तिसऱ्या लाटेत पालिकेचे १७२ कर्मचारी बाधित सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ६ : कोविडच्या तिसऱ्या लाटेचा फटका आता महापालिकेलाही बसू लागला आहे. गेल्या १८ दिवसांत पालिकेच्या १७२ कर्मचाऱ्यांना कोविडची बाधा झाली आहे. आतापर्यंत कोविडबाधित होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सात हजार २१ वर पोहचली आहे. डिसेंबरअखेर महापालिकेच्या २५० हून अधिक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. १७ डिसेंबर ते ५ जानेवारीदरम्यान मुंबईत ६७ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. १७२ जणांमध्ये प्रामुख्याने कामगारांचा समावेश आहे. उपायुक्त दर्जाच्या चार अधिकाऱ्यांनाही कोरोना झाला आहे. बाधित कर्मचाऱ्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बहुतांश कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल होण्याची गरज नसल्याने विलगीकरणात ठेवण्यात आले असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. २५९ जणांचा मृत्यू झाला मुंबई महापालिकेच्या सात हजार ६८ कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोविडची बाधा झाली आहे. त्यातील २५९ जणांचा मृत्यू झाला आहे. सहा हजार ५२९ जणांनी कोविडवर मात केली आहे. घनकचरा विभागातील सर्वाधिक ५७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सर्व विभागांतील ड श्रेणीतील २२८७ कामगारांना कोविडची बाधा झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com