डोंबिवली : रिक्षा, मोटारसायकल चोर अटकेत | Dombivali crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 thief arrested
रिक्षा, मोटारसायकल चोर अटकेत

डोंबिवली : रिक्षा, मोटारसायकल चोर अटकेत

sakal_logo
By

डोंबिवली : रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या रिक्षा, दुचाकी चोरणारा अट्टल चोर रोशन म्हात्रे (thief arrested) याला रामनगर पोलिसांनी बेड्या (ramnagar police) ठोकल्या आहेत. त्याच्याकडून चोरी केलेल्या दोन रिक्षा व मोटरसायकल असा एकूण २ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. टिळकनगर व डोंबिवली पोलिस ठाण्यातील प्रत्येकी दोन असे एकूण ४ गुन्हे उघडकीस आले आहेत. (Ramnagar police arrested thief roshan mhatre in robbery crime)

हेही वाचा: लोकांना कोरोनाबरोबर जगणे शिकवा; भाजप महिला आघाडीचा सरकारला सल्ला

डोंबिवली पूर्वेतील फडके रोड परिसरात उभी केलेली चंद्रेश मुंवरकर (वय ३८) यांची दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी ११ मे रोजी रामनगर पोलिस ठाण्यात नोंदविली होती. रामनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संदीप शिंगटे, पोलिस हवालदार विशाल वाघ, शंकर निवळे, पोलिस नाईक प्रशांत सरनाईक, जयपाल मोरे, वैजनाथ रावखंडे हे ४ जानेवारीला पेट्रोलिंगवर असताना रात्री ९.३० च्या सुमारास पोलिस हवालदार विशाल वाघ यांना गुप्त बातमीदारामार्फत रोशन म्हात्रे हा मोटरसायकलचोर सुनील नगर, नांदिवली नाला परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून रोशन याला अटक केली. त्याने एकूण चार गुन्ह्यांची कबुली दिली असून त्याच्याकडून २ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :dombivalicrime update
loading image
go to top