लोकांना कोरोनाबरोबर जगणे शिकवा; भाजप महिला आघाडीचा सरकारला सल्ला | Sheetal gambhir desai | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sheetal gambhir desai
लोकांना कोरोनाबरोबर जगणे शिकवा; भाजप महिला आघाडीचा सरकारला सल्ला

लोकांना कोरोनाबरोबर जगणे शिकवा; भाजप महिला आघाडीचा सरकारला सल्ला

sakal_logo
By

मुंबई : कोरोना विषाणूंची (corona virus) नवनवीन रूपे ही आता आपल्याबरोबर दीर्घकाळ राहणार आहेत. ही बाब लक्षात घेता सरकारने (government) नागरिकांना कोरोनाबरोबर जगण्यास शिकवावे. दर वेळी लॉकडाऊन लावून त्याचे नवनवे नियम लोकांना शिकवू नयेत, असा सल्ला भाजप मुंबई महिला (Mumbai bjp) आघाडीच्या प्रमुख शीतल गंभीर देसाई (Sheetal gambhir desai) यांनी सरकारला दिला. कोरोनाची तिसरी लाट आणि ओमिक्रॉनचा धोका देशात वाढत असताना महाराष्ट्रात मात्र राज्य सरकार लॉकडाऊन लावण्याच्या विचारात आहे. (Mumbai bjp leader sheetal gambhir desai gives suggestion to Maharashtra government about corona pandemic)

हेही वाचा: मुंबई : पोलीस हवालदाराची खलबत्याने ठेचून हत्या

मात्र आपण पूर्वीपासून क्षयरोग, फ्ल्यू, रेबिज तसेच इतर विषाणूजन्य रोगांबरोबर राहात आहोत. त्यामुळे आता कोरोना विषाणूसोबत राहण्याची सवय करून घेतली पाहिजे. प्रशासनाने त्या दृष्टीने नागरिकांची मानसिक व शारीरिक तयारी करून घ्यावी. दर वेळी लॉकडाऊन लावून लोकांचे जीवन उद्ध्वस्त करू नये, असेही देसाई यांनी म्हटले आहे. जीवनावश्यक बाबींवर निर्बंध नको!

आधीच दोन लॉकडाऊनमुळे अनेक छोट्या-मोठ्या उद्योजक-व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे आता पुन्हा लॉकडाऊन लावल्यास उद्योग-व्यापारावर त्याचा परिणाम होणार नाही, याची सरकारने काळजी घ्यावी. शाळा-महाविद्यालये, बागा-चौपाट्या, सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांवर जरूर निर्बंध लादावेत; मात्र जीवनावश्यक बाबींवर निर्बंध लादू नयेत, असेही देसाई यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top