Omicron patients
Omicron patientssakal media

उल्हासनगर : OMICRON रिपोर्ट येण्यापूर्वीच पुन्हा भारताच्या टूरवर; गुन्हा दाखल

ओमिक्रॉन अहवालाची वाट न पाहताच कुटुंब भारतभ्रमंतीवर प्रवासात असतानाच तिघे पॉझिटिव्ह आढळले

उल्हासनगर : केनियातून उल्हासनगरात (kenya to ulhasnagar) परतलेल्या एका कुटुंबातील चौघांची आरटीपीसीआर चाचणी (RTPCR Test) करून अहवाल येईपर्यंत त्यांना गृहविलगीकरणात (home quarantine) राहण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र अहवालाची वाट न बघता या कुटुंबाने देशभ्रमंती केल्याचे उघड झाले आहे. प्रवासात असतानाच या कुटुंबातील चौघांपैकी तिघे ओमिक्रॉन पॉझिटिव्ह (omicron positive) होते, अशी धक्कादायक माहिती पालिकेचे सहायक आयुक्त अजित गोवारी यांनी दिली असून, शासनाचे नियम पायदळी तुडवल्याप्रकरणी या कुटुंबावर गुन्हा दाखल (police FIR) करण्यात आला आहे. (police compliant filed on family who wandering in a country without seeing rtpcr report)

Omicron patients
भिवंडीत रात्रभरात आगीच्या तीन घटना; दोन कामगार जखमी

१७ डिसेंबर रोजी प्रभाग समिती ३ च्या हद्दीत राहणारे ४ जणांचे हे कुटुंब केनियातून आले होते. शासनाच्या धोरणानुसार आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करणे अनिवार्य आहे. त्याप्रमाणे चाचणी करून त्यांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले होते. अहवाल प्राप्त होईपर्यंत त्यांनी घरातच थांबणे बंधनकारक असताना हे कुटुंब पालिकेला कोणतीही माहिती न देता २२ तारखेला भारत भ्रमंतीवर निघून गेले. दरम्यान अहवालात त्यांच्या मुलाचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला.

ही माहिती कुटुंबप्रमुखाला फोनवर दिल्यावरही ते माघारी परतले नाहीत. २६ तारखेला ओमिक्रॉन चाचणीसाठी त्यांचे स्वॅब घेऊन पुण्याला पाठवण्यात आले होते. ३१ तारखेला हे कुटुंब प्रवासावरून परत आले. पुण्यावरून ४ आणि ५ जानेवारी रोजी त्यांचा अहवाल आला. त्यात ४ पैकी पती, पत्नी आणि मुलगा ओमिक्रॉनबाधित आढळून आले आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे व मार्गदर्शक तत्त्वांचे, आपत्ती व्यवस्थापन आणि साथरोग नियंत्रण अधिनियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्या निर्देशानुसार या कुटुंबावर विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सहायक आयुक्त अजित गोवारी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com