blood  stock
blood stockSakal Media

"तिसऱ्या लाटेसाठी पुरेशा रक्तसाठा उपलब्ध करा"

राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून केंद्रांना आदेश

मुंबई : कोरोनाची तिसरी लाट (corona third wave) लवकरच येण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्व केंद्रांत रक्ताचा पुरेसा साठा (blood stock) उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून रक्तपेढ्याप्रमुखांना देण्यात आले आहेत. सध्या राज्यात रक्ताचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे (corona infection) सरकारतर्फे जमावबंदीसारखे कडक निर्बंध लावण्यात येत आहेत. (Need of blood stock in mumbai for corona third wave)

blood  stock
मुंबई : 25 लाखांच्या खंडणीप्रकरणात दोन तरुणांना अटक

या निर्बंधांमुळे स्वैच्छिक रक्तदान शिबिरे घेण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सर्व रक्त केंद्रप्रमुखांना एसबीटीसीने रक्ताचा पुरेपूर साठा उपलब्ध करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेदरम्यान, गरजेप्रमाणे रक्त केंद्रांमध्ये रक्ताचा साठा उपलब्ध ठेवावा आणि अन्य उपाययोजना पुरवाव्यात, असेही सांगण्यात आले आहे.

राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एका रक्तकेंद्रात जादा असलेले रक्त गरज असलेल्या दुसऱ्या रक्तकेंद्रात पाठवण्यात यावे. तसेच, थॅलसेमिया रुग्णांना नियमित रक्त संक्रमण करावे लागत असल्यामुळे त्यांच्याबाबतीत रक्ताचा तुटवडा भासणार नाही, याची पुरेपूर काळजी घेण्यात यावी, असे आदेश आरोग्य सेवा संचालक डॉ. साधना तायडे यांनी सर्व रक्तपेढ्याप्रमुखांना दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com