मुंबई : 25 लाखांच्या खंडणीप्रकरणात दोन तरुणांना अटक | Mumbai crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Culprit arrested
मुंबई : 25 लाखांच्या खंडणीप्रकरणात दोन तरुणांना अटक

मुंबई : 25 लाखांच्या खंडणीप्रकरणात दोन तरुणांना अटक

मुंबई : एका व्यक्तीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्या देऊन त्याच्याकडून तब्बल २५ लाखांची खंडणी (extortion case) घेतल्याप्रकरणी दोन तरुणांना सोमवारी अंधेरीतून पोलिसांनी अटक (two culprit arrested) केलीय. हर्ष कुमार कामत (१८) आणि आर्षद अस्लम शेख (१९) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन वर्षांपासून तक्रारदार व्यक्तीकडून हे आरोपी खंडणी घेत होते, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. याबाबतचं वृत्त मिडडेनं दिलं आहे. (Two culprit arrested in extortion crime for getting twenty five lac rupees from a person )

हेही वाचा: धक्कादायक ! मुंबईत 1 हजारात बोगस लसीकरण प्रमाणपत्र

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "२०१९ मध्ये कामतने फिर्यादीकडून २५ हजार रुपयांची खंडणी मागितली होती. आरोपीने त्याच्या मित्राच्या आईची प्रकृती ठीक नसल्याने पैशांची गरज असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर पीडित व्यक्तीनं त्याच्या पालकांना याबाबत कोणतीही कल्पना न देता आरोपींना पैसे दिले.

पीडित व्यक्तीनं दिलेल्या रक्कमेची मागणी केल्यानंतर आरोपींनी त्याला ब्लॅकमेल करणं सुरु केलं." तसंच डिसेंबर २०२१ मध्ये आरोपींनी १२ लाख रुपयांची खंडणी घेतली आणि १३ लाख रुपये किमतीचं सोनं तक्रारदार व्यक्तीकडून घेतलं. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai Newscrime update
loading image
go to top