रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण तुलनेत कमी
डॉक्टरांचा कोरोना नियम पालनाचा सल्ला
घाटकोपर, ता. ८ ः कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता निर्माण झाली आहे. मात्र यावेळी तुलनेत रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अनेक रुग्णांमध्ये लक्षणे सौम्य असल्याने त्यांना सात दिवस विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. ज्यांना ताप, सर्दी व डोकेदुखी आहे तेच रुग्ण रुग्णालयात भरती होत आहेत. मात्र असे रुग्ण तीन दिवसांत रिकव्हर होत असल्याने पाच दिवसांत त्यांना डिस्चार्ज देण्यात येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
आज दिवसभरात एच. जे. दोशी हिंदुसभा घाटकोपर रुग्णालयात २८ रुग्ण दाखल आहेत. दाखल असलेल्या रुग्णांमध्ये कोणी गंभीर नाही. भरती होणारे रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाणदेखील वाढत आहे. देशात झालेल्या प्रभावी लसीकरण मोहिमेमुळे तिसऱ्या लाटेत रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण कमी आहे. असे असले तरी नागरिकांनी शासनाच्या सूचनांचे पालन केले पाहिजे. आजार असल्यास घरच्या घरी उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, असे डॉक्टरांनी सांगितले.
...
कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. मात्र यावेळेस रुग्णांमध्ये बरे होण्याचे प्रमाणदेखील तितकेच वाढत आहे. आज २८ रुग्ण दाखल आहेत. रिकव्हर होत आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेत रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहेच, त्याच बरोबर मृत्यूचे प्रमाणदेखील कमी आहे. तरीही या लाटेत शासनाच्या नियमांचे पालन होणे आवश्यक आहे.
- डॉ. रजनीकांत मिश्रा, हिंदूसभा रुग्णालय, घाटकोपर.
...