फेरीवाल्याला दोन लाख रुपयांना गंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फेरीवाल्याला दोन लाख रुपयांना गंडा
फेरीवाल्याला दोन लाख रुपयांना गंडा

फेरीवाल्याला दोन लाख रुपयांना गंडा

sakal_logo
By
फेरीवाल्याला दोन लाख रुपयांना गंडा ठाणे, ता. ८ ः शहरातील एका फेरीवाल्याला ५० हजार युएस डॉलरचे प्रलोभन दाखवून त्याच्या बॅंक खात्यामधून दोन लाख २६ हजार रुपये घेऊन अज्ञात चोराने फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. घोडबंदर मानपाडा परिसरातील फेरीवाल्याला फेसबुक व मोबाईल व्हॉट्सअॅपवर मेसेज टाकून कोरोनाच्या आजारपणामुळे एका व्यावसायिकाचे झालेल्या नुकसान भरपाईच्या मोबदल्यास ५० हजार युएस डॉलरचे प्रलोभन दाखविले होते. त्यानंतर हे पैसे हवे असतील तर तुमच्या अकाऊंटमधून २ लाख २६ हजार एवढी रक्कम ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी ५० हजार यूएस डॉलर मिळणार, या अपेक्षेने ही रक्कम ट्रान्स्फर केली. मात्र त्यांना मिळणारी रक्कम त्यांना मिळालीच नाही. अखेर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे समजल्यावर त्यांनी चितळसर पोलिस ठाण्यात धाव घेऊन या विरोधात तक्रार दाखल केली आहे. ही घटना २ डिसेंबर २०२१ रोजी घडली. त्यानंतर वाट बघूनही पैसे न आल्याने त्यांनी सात जानेवारीला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चितळसर पोलिस ठाण्याचे पोलिस करीत आहेत.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top