विराट कोहलीच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल- कार्तिक आर्यन

विराट कोहलीच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल- कार्तिक आर्यन

विराट कोहलीच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल ः कार्तिक आर्यन सध्या बॉलिवूडमध्ये अनेक दिग्गज मंडळींवर बायोपिक बनवण्याचा ट्रेंड सुरू आहे. अनेक कलाकार तसेच क्रिकेटपटू यांच्या जीवनावर सध्या बायोपिक बनत आहेत. आता कार्तिक आर्यनने त्याच्या आवडत्या क्रिकेटरच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा वर्तवली आहे. कार्तिक इंडस्ट्रीमधील आघाडीचा अभिनेता आहे. सध्याची तरुणाई त्याच्यावर अक्षरशः फिदा आहे. कार्तिक आर्यनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे की, भविष्यात मला संधी मिळाली तर मी विराट कोहलीच्या बायोपिकमध्ये नक्कीच काम करीन. विराटचा संपूर्ण प्रवास अतिशय खास आहे आणि विराट माझ्या आवडत्या क्रिकेटरपैकी एक आहे. त्यामुळे मला संधी मिळाल्यास मी नक्कीच यामध्ये काम करेन. कार्तिक विराटचा मोठा फॅन असल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com