स्वातंत्र्यसैनिकाची भूमिका साकारण्याची भूमी पेडणेकरची इच्छा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वातंत्र्यसैनिकाची भूमिका साकारण्याची भूमी पेडणेकरची इच्छा
स्वातंत्र्यसैनिकाची भूमिका साकारण्याची भूमी पेडणेकरची इच्छा

स्वातंत्र्यसैनिकाची भूमिका साकारण्याची भूमी पेडणेकरची इच्छा

sakal_logo
By
स्वातंत्र्यसैनिकाची भूमिका साकारण्याची भूमी पेडणेकरची इच्छा अभिनेत्री भूमी पेडणेकरने आतापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत. तिच्या चित्रपटातील हटके भूमिकांचे प्रेक्षकांनी चांगले स्वागतही केले आहे. आता तिचे अनुभव सिन्हाचा ''भोद'', राजकुमार रावसोबत ''बधाई दो'', अजय बहलचा ''लेडी किलर'', शशांक खेतानचा ''मिस्टर लेले'' आणि अक्षय कुमारबरोबरचा ''रक्षाबंधन'' हे चित्रपट सेटवर आहेत. या चित्रपटातील तिच्या भूमिका वेगळ्या आणि वैशिष्टपूर्ण आहेत; परंतु आता भूमीला स्वातंत्र्यसैनिकाची भूमिका साकारण्याची इच्छा आहे. याबाबत भूमी म्हणते, “स्वातंत्र्यसैनिकाची भूमिका पडद्यावर साकारणं हे माझं स्वप्न आहे. आता कोणता निर्माता व दिग्दर्शक मला अशी भूमिका देतो याची मी वाट पाहत आहे. दरवेळी निरनिराळी पात्रे उत्तमरित्या साकारणाऱ्या भूमीला स्वातंत्र्यसैनिक या भूमिकेत बघायला मिळणे ही चाहत्यांसाठी देखील पर्वणीच असेल. अद्याप तरी हा दिवस कधी उगवेल हे स्पष्ट झाले नाही.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top